एक्स्प्लोर

अपराजित नाईक घराणं! 1952 पासून विधिमंडळात प्रतिनिधित्व; अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईकांना पुन्हा उमेदवारी 

पुसद विधानसभा मतदारसंघातून (Pusad Constituency) इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाईक घराणं हे 1952 पासून विधिमंडळात प्रतिनिधित्व करत आहे.

Pusad Assembly constituency Indranil Naik : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar Group) देखील आज उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघातून (Pusad Constituency) इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाईक घराणं हे 1952 पासून विधिमंडळात प्रतिनिधित्व करत आहे. राज्याच्या राजकारणात नाईक घराणं हे अपराजित घराणं आहे. 

 वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांनी  राज्याचे मुख्यमंत्री पदही सांभाळलं

1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकी दिवंगत वसंतराव नाईक यांच्यापासून तर आजपर्यंत नाईक घराण्यातील उमेदवार हा राज्याच्या राजकारणात अपराजित आहे. वसंतराव नाईक नंतर सुधाकरराव नाईक यांनी 1978  मध्ये राजकारणात आले. वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांनी  राज्याचे मुख्यमंत्री पदही सांभाळले. सुधाकरराव नाईक यांच्या अपघाती निधनानंतर 2001 पासून मनोहरराव नाईक राजकारनात सक्रीय होऊन 2019 पर्यंत आमदार आणि मंत्री राहिले. 2019 मध्ये पुत्र इंद्रनील नाईक हे आमदार असून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पासून नाईक घराणे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्याने आमदार इंद्रनील नाईक हे अजित पवार गटाशी एकनिष्ठ राहिले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादी

  1. बारामती- अजित पवार
  2. येवला- छगन भुजबळ
  3. आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
  4. कागल- हसन मुश्रीफ 
  5. परळी- धनंजय मुंडे
  6.  दिंडोरी- नरहरी झिरवाळ
  7. अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
  8. श्रीवर्धन-  आदिती तटकरे
  9. अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
  10.  उदगीर- संजय बनसोडे 
  11. अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
  12. माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
  13. वाई- मकरंद पाटील
  14. सिन्नर- माणिकराव कोकाटे
  15. खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील
  16. अहमदनगर शहर- संग्राम जगताप
  17.  इंदापूर- दत्तात्रय भरणे
  18. अहमदपूर- बाबासाहेब पाटील
  19.  शहापूर- दौलत दरोडा
  20.  पिंपरी- अण्णा बनसोडे
  21.  कळवण- नितीन पवार
  22. कोपरगाव- आशुतोष काळे
  23. अकोले - किरण लहामटे
  24. वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
  25. चिपळूण- शेखर निकम
  26. मावळ- सुनील शेळके
  27. जुन्नर- अतुल बेनके
  28. मोहोळ- यशवंत माने
  29.  हडपसर- चेतन तुपे
  30.  देवळाली- सरोज आहिरे
  31. चंदगड - राजेश पाटील
  32. इगतुरी- हिरामण खोसकर
  33. तुमसर- राजे कारमोरे
  34. पुसद -इंद्रनील नाईक
  35. अमरावती शहर- सुलभा खोडके
  36. नवापूर- भरत गावित
  37.  पाथरी- निर्णला विटेकर
  38. मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला

महत्वाच्या बातम्या:

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कोणाकोणाला तिकीट मिळालं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget