अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कोणाकोणाला तिकीट मिळालं?
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 38 उमेदवारांचा समावेश आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 38 उमेदवारांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आज आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांना परळीतून, दिलीप वळसे पाटील यांना, आंबेगावमधून आशुतोष काळे यांना, कोपरगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यादी
- बारामती- अजित पवार
- येवला- छगन भुजबळ
- आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
- कागल- हसन मुश्रीफ
- परळी- धनंजय मुंडे
- दिंडोरी- नरहरी झिरवाळ
- अहेरी- धर्मरावर बाबा अत्राम
- श्रीवर्धन- आदिती तटकरे
- अंमळनेर- अनिल भाईदास पाटील
- उदगीर- संजय बनसोडे
- अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले
- माजलगाव- प्रकाश दादा सोळंके
- वाई- मकरंद पाटील
- सिन्नर- माणिकराव कोकाटे
- खेड आळंदी - दिलीप मोहिते पाटील
- अहमदनगर शहर- संग्राम जगताप
- इंदापूर- दत्तात्रय भरणे
- अहमदपूर- बाबासाहेब पाटील
- शहापूर- दौलत दरोडा
- पिंपरी- अण्णा बनसोडे
- कळवण- नितीन पवार
- कोपरगाव- आशुतोष काळे
- अकोले - किरण लहामटे
- वसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
- चिपळूण- शेखर निकम
- मावळ- सुनील शेळके
- जुन्नर- अतुल बेनके
- मोहोळ- यशवंत माने
- हडपसर- चेतन तुपे
- देवळाली- सरोज आहिरे
- चंदगड - राजेश पाटील
- इगतुरी- हिरामण खोसकर
- तुमसर- राजे कारमोरे
- पुसद -इंद्रनील नाईक
- अमरावती शहर- सुलभा खोडके
- नवापूर- भरत गावित
- पाथरी- निर्णला विटेकर
- मुंब्रा-कळवा- नजीब मुल्ला
काल प्रवेश आज उमेदवारी जाहीर
राजकुमार बडोले यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. आज त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राजेश विटेकर यांच्या आई निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली. प्रकाश सोळंके यांनी मुलासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने पुन्हा त्यांच्याच नावाची घोषणा केली आहे. हिरामण खोसकर आणि सुलभा खोडके हे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आले आणि पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली. कळवा मुंब्रा मतदारसंघात पक्षाने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुस्लीम चेहरा म्हणून नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली
हे ही वाचा :
अजितदादांच्या पक्षाला रामराम ठोकून उमेश पाटील अडचणीत, रोहित पवारांचा विरोध, आता शरद पवारांना भेटणार




















