एक्स्प्लोर

Sachin Pilot: नाव पायलट पण हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी लँड; सचिन पायलटांना जाना था गोंदिया पोहोचे गडचिरोली

Sachin Pilot: काँग्रेस नेते सचिन पायलट गोंदियाऐवजी पोहोचले गडचिरोलीतील सभेच्या ठिकाणी; नेमकं काय घडलं?

नागपूर: आडनाव पायलट आणि विमानाची दिशाच जर चुकत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार? होय, असंच काहीसं घडलंय काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यासोबत. महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि सभेसाठी देशभरातील नेते मंडळी सध्या राज्यात येत आहेत. सभा, प्रचार दौरे, रॅली करत आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेस नेते सचिन पायलट देखील   विदर्भात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते, त्यावेळी सचिन पायलट यांचं हेलिकॉप्टर वैमानिकाच्या चुकीमुळे ते गोंदिया जिल्ह्यात लँड होण्याऐवजी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीमध्ये लँड झालं होतं. योगायोगाने आरमोरीमध्ये त्याच वेळेस काँग्रेस नेते कन्हैया कुमार हेलिपॅडवर येणा होते, मात्र, पुन्हा त्यांनी युटर्न घेतला आणि ठरलेल्या सभेच्या ठिकाणी पोहोचले. 

नेमकं काय घडलं?

दोन दिवसांपूर्वी सचिन पायलट विदर्भात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. नागपुरातून सचिन पायलट हेलिकॉप्टरने गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीसाठी निघाले. मात्र, वैमानिकाच्या चुकीमुळे ते गोंदिया जिल्ह्यात लँड होण्याऐवजी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी मध्ये लँड झाले. मात्र, योगायोगाने आरमोरीमध्ये त्याच वेळेस काँग्रेसने ते कन्हैया कुमार हेलिपॅडवर येणे अपेक्षित होते. त्यामुळे आरमोरीमधील काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्या स्वागतासाठी तिथे तैनात होते. हेलिकॉप्टरमधून अचानक कन्हैया कुमार यांच्या ऐवजी सचिन पायलट समोर आल्याने आरमोरी मधील काँग्रेस नेते ही चकित झाले.

हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर सचिन पायलट आणि त्यांच्या वैमानिकाला आपण वेगळ्याच ठिकाणी लँड झाल्याची चूक लक्षात आली. सचिन पायलट यांनी आरमोरीमधील काँग्रेस नेत्यांशी बातचीत केली आणि तिथून ते गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीसाठी रवाना झाले. चुकीच्या लँडिंगच्या या घटनेमुळे सचिन पायलट मोरगाव अर्जुनीच्या सभेत सुमारे तीन तास उशिरा पोहोचले आणि पायलट यांच्या सभेला उशीरा सुरुवात झाली.

चुकीच्या लँडिंगची सचिन पायलट यांची कबुली

त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनीमधील सभेत सचिन पायलट यांनी भाषणात मान्य केले की, त्यांच्या हेलिकॉप्टर पायलटने त्यांना चुकीच्या ठिकाणी उतरविले होते. त्यामुळे त्यांना सभेत येण्यासाठी उशीर झाला. भाषणावेळी बोलताना सचिन पायलट म्हणाले, 'उशीर झाला त्यासाठी तुम्हा सर्वांची मी क्षमा मागतो. आमच्या हेलिकॉप्टरने आम्हाला दुसऱ्याच ठिकाणी उतरवलं होतं. दुसऱ्या सभेच्याच ठिकाणी हेलिकॉप्टरने आम्हाला उतरवलं, त्यानंतर पुन्हा इकडे येण्यासाठी आम्हाला उशीर झाला. हे निवडणुकांच्या दरम्यान होतंच. मात्र, मला इथं पोहचायला उशीर झाला त्यासाठी मी तुमची पुन्हा क्षमा मागतो, या निवडणुकीच्या अनुषंगाने मला माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या आणि तुमचे आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली', असंही पुढे सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
Gokul Chairman Election 2026 Rajesh Patil: जोपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, भीष्मप्रतिज्ञा करणारे राजेश पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाचे उमेदवार, धगधगती राजकीय कारकीर्द!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: अखेर ज्याची भीती होती तेच झालं, महायुती सरकारकडून गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अखेर ज्याची भीती होती तेच झालं, गोकुळवर 4 सरकारी संचालकांच्या नियुक्तीला मंजुरी, बंटी पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Jalgaon Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गिरीश महाजन यांचा मार्ग मोकळा; विरोधी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद, नेमकं काय घडलं?
NCP Merger : सुप्रिया सुळेंकडून विलिनीकरणावर भूमिका स्पष्ट, आता खासदार निलेश लंके म्हणाले, आमचा नेता जो निर्णय घेईल...
आमचा नेता खंबीर, ते जो निर्णय घेतील आम्ही त्यासोबत आहोत, खासदार निलेश लंके म्हणाले...
FDA Action on Vaishali Roopali Hotel : कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
कच्चा माल साठवण्याचे फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाच्या; डोसा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ, अधिकाऱ्यांना रूपाली अन् वैशाली हॉटेलमध्ये काय-काय दिसलं?
Meenakshi Shinde : मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मीनाक्षी शिंदे पुन्हा अडचणीत येणार? प्रतिज्ञापत्रात फक्त 3 दुचाकी, प्रत्यक्षात कंत्राटदाराच्या 1.5 कोटींच्या व्होल्वोतून प्रवास; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुराव्यांसह तक्रार
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
मोठी बातमी : ना सत्तेत जाणार, ना विलिनीकरण होणार, सुप्रिया सुळेंचा शब्द, म्हणाल्या, दादा होता तोपर्यंतच चर्चा, आता फुल्ल स्टॉप!
FDA Action on Vaishali Rupali Hotel : मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
मोठी बातमी : पुण्यातील वैशाली आणि रुपाली हॉटेलचे परवाने निलंबित, तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई, कारण काय?
Sinhagad Technical Educational Institute: सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
सिंहगड संस्था गैरकारभार प्रकरण; मारुती नवले यांच्यासह विश्वस्तांना पुणे सोडण्यास मनाई, सीबीआय, ईडी चौकशीचे आदेश, न्यायलयाने ओढले ताशेरे
Embed widget