एक्स्प्लोर

Rahul Kalate: निवडणुकीच्या रणधुमाळीत तुतारी फुंकलेल्या राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Rahul Kalate: शरद पवार पक्षाचे चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड: चिंचवड विधानसभेत शरद पवार गटाकडून राहुल कलाटेंनी अर्ज दाखल केला आणि काही तासांतच त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे. जावेद शेख या त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने हा गुन्हा दाखल केला आहे. मी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरत असल्याचं पाहून कलाटे संतापले. आपण एकाच गावातले असताना तू अर्ज का भरतोय, तू वंचितच्या तिकिटावर लढलास तर तुझी खैर नाही. अशी धमकी राहुल कलाटेंनी दिल्याचा आरोप जावेद शेख यांनी केला आहे. 

शेख यांनी त्यांच्याकडे वंचितचा एबी फॉर्म असल्याचा ही दावा केला आहे. तर दुसरीकडे जितेंद्र वाडघरे यांनी सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीची दावेदारी केली आहे. त्यामुळं घडलेला प्रकारावरून वेगवेगळे तर्क-वितर्क ही लावले जात आहेत. कारण वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या पाठिंब्याने 2019 ची विधानसभा आणि पोटनिवडणुक अशा दोन निवडणुका राहुल कलाटे लढलेले आहेत. 

तसेच वंचितचे प्रदेश कार्यकारिणीवरील पदाधिकारी अनिल जाधव आणि राहुल कलाटे यांचे निकटचे संबंध आहेत. हे पाहता कलाटे यांना वंचितच्या तिकिटावर चिंचवडमध्ये कोण उभं राहणार? याची थोडी फार का होईना आधीचं कल्पना नक्कीच असेल. मात्र चिंचवड विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय असलेल्या ग प्रभागात जावेद शेख हे वंचित कडून अर्ज दाखल करत असल्याचं दिसून आलं. त्यावेळी तू इथून कसं काय अर्ज भरतोय? आपण तर एकाच गावातील आहोत, त्यामुळं तू वंचितच्या तिकिटावर लढलास तर तुझी खैर नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप जावेद शेख यांनी केला आहे. 

मात्र हे आरोप खोटे असल्याचा आणि भाजपच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल झाल्याचा दावा राहुल कलाटे यांनी केला आहे. माझं शक्तिप्रदर्शन पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनीच हे षडयंत्र केलं आणि सत्तेचा दुरुपयोग करत माझ्यावर हा खोटा गुन्हा दाखल केला, असा पलटवार राहुल कलाटे यांनी केला आहे.

चिंंचवडमधून राहुल कलाटेंना संधी 

चिंचवड मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राहुल कलाटे यांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्याजागी भाजपकडून शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : राज्यात सरकार आणायचंय, महाराष्ट्रासाठी लढतोय, पदांची लालसा नाहीKudal Rada | कुडाळमध्ये उमेदवारी अर्जाची छाननी सुरू असताना राडा,महायुती-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडलेVarsha Gaikwad Chitra Wagh Rupali Chakankar Ayodhya Pol Majha Vision : राज्यातील महिला ब्रिगेड UNCUTSpecial Report Sanjay Raut : सांगली पॅटर्न कुणाच्या बाजूने ? राऊतांचा सवाल, मविआत वादळाची चिन्ह

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी
Shara Pawar: शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध ठोकला शड्डू; युगेंद्रांना घेऊन तावरेंच्या घरी, भेटीत काय चर्चा
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
ह्रदयद्राक... दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 2 मुलांचा महिलेचा मृत्यू
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
आबांना काय मानसिक त्रास झाला हे मला माहितीय; नारळ फोडताच रोहीत पाटलांनी डागली तोफ
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
पालघरमध्ये सापडलं 5 कोटीचं घबाड, पोलिसांच्या उत्तरानं आमदार अवाक्; दादरा नगरहून महाराष्ट्रात आली रक्कम
India China complete Disengagement in Depsang Demchok : भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
भारत-चीन सीमेवर डेपसांग आणि डेमचोकमधून सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण; दोन्ही सैनिक एकमेकांना उद्या मिठाई भरवणार!
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
ठाकरेंची तोफ धडाडणार, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही सभा
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
भिवंडीत कारमध्ये घबाड, रोकड जप्त; मतदारसंघात स्टॅटिक सर्विलन्स टीमची कारवाई
Embed widget