Amit Thackeray: अमित ठाकरेंना उद्धव काकांबाबत काय वाटतं? म्हणाले, ते कसे आहेत तेव्हाच मला कळालं, म्हणून....
Amit Thackeray On Uddhav Thackeray: मी इतरांनी काय नाही केलं हे सांगण्यापेक्षा मी काय करू शकतो हेच लोकांना सांगणार, अशी माहिती अमित ठाकरेंनी दिली.
Amit Thackeray Mahim Vidhan Sabha मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) देखील यावेळी विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरेंना माहीम विधानसभा मतदारसंघातून (Mahim Vidhan Sabha Election 2024) तिकीट देण्यात आलं आहे. मनसेकडून उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरे कामला लागल्याचे दिसून आले. काल अमित ठाकरेंनी माहिममध्ये मेळावा घेत पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी माहीम विधानसभा जिंकून साहेबांना भेट द्यायची आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.
अमित ठाकरेंनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी अमित ठाकरे आजारी असताना उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मनसेचे 6 नगरसेवक फोडले होते. त्यावेळीचा उल्लेख देखील अमित ठाकरेंनी यावेळी केला. 2017 मध्ये सेनेने 7 पैकी 6 नगरसेवक मी आजारी असताना फोडले, हे खोके खोके बोलतात, त्यांनी किती खोके दिले हे मलाही माहिती आहे. ते कसे आहेत, तेव्हाच मला कळलं. त्यामुळे अशा लोकांपासून थोड दूर राहिलेलं बरं, असं अमित ठाकरेंनी सांगितले.
मी काय करू शकतो हेच लोकांना सांगणार- अमित ठाकरे
माहीम मतदार संघातील विषय माझे तोंडपाठ आहेत, माहीम पोलिस कॉलनी, कोळी बांधवांची वसाहत, दादर माहीम समुद्र किनारा, मिठी नदी आणि आजच्या रस्त्यांची दुरावस्था हे माझ्यासाठी प्रमुख विषय असतील, असं अमित ठाकरे म्हणाले. मी इतरांनी काय नाही केलं हे सांगण्यापेक्षा मी काय करू शकतो हेच लोकांना सांगणार, अशी माहिती अमित ठाकरेंनी दिली.
उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उतरवला उमेदवार-
अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही?, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात महेश सावंत यांना उमेदवारी दिली. तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यामान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. माहीममध्ये विजय ठाकरे गटाचाच होणार आहे. 23 तारखेला आम्ही जल्लोषमध्ये आम्ही तुमच्याशी बोलू. पक्षप्रमुखांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र बसवलं. आम्हाला म्हणाले की, मला बाकी काही नको, माहीमवर भगवा फडकलाच पाहिजे. एकदिलाने काम करा, बाकी सत्ता आपलीच आहे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचे महेश सावंत यांनी म्हटले. आम्ही माहीममध्ये कामाला सुरुवात केली आहे. आता अमित ठाकरे यांना ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे, त्यांनी द्यावा. पण उद्धव साहेबांनी आम्हाला लढ सांगितलं आहे. मग आम्ही जिंकूनच पुन्हा मातोश्रीवर येणार, असेही महेश सावंत यांनी म्हटले.