Kolhapur Crime : निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
Kolhapur Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटातील प्रसाद नरामला अटक करण्यात आली आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरात गोवा बनावटीच्या दारूचा महापूर सुरुच असून आता 10 लाखांवर दारु जप्त करण्यात आली आहे. कोल्हापुरात रंकाळा तलाव परिसरात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले. या कारवाईत 9 लाख 78 हजार रुपयांच्या दारूसह 14 लाख 28 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटातील प्रसाद नरामला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आठ दिवसांपूर्वीच कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने 7 लाख 40 हजार 880 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकरयांनी अवैध दारुची विक्री व वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कारवाई करणेसाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत.
साडे सात लाख किंमतीची गोवा बनावटीची दारु जप्त
अवैध दारुवर कारवाई करणेसाठी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेला पार्ले, (ता. चंदगड) गावच्या हद्दीत जुवाव सालदाना यांचे मालकीचे पत्र्याचे शेडचे बाजूला उघडयावर गोवा बनावटीचे दारुचा साठा केल्याची गोपनीय माहिती मिळाली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांचे पथकाने पार्लेतच छापेमारी केली. छापेमारीत शिवाजी धाकलू गावडे (वय 38, रा. पार्ले, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याच्याकडे जवळपास साडे सात लाख किंमतीची गोवा बनावटीची दारु मिळून आली.
मुंबईत व्हॅनमध्ये सापडल्या 6500 किलो चांदीच्या विटा
मुंबईतील विक्रोळीमध्ये एका कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या आहेत. विकोळी पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेल्या या विटा एकूण साडेसहा टन इतक्या आहेत. करोडोंच्या घरात यांची किंमत आहे. या चांदीच्या विटा मुलुंडमधील एका गोदामामध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी चाल्या होत्या. या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
यापूर्वी मुंबईतील भुलेश्वरमध्ये देखील सापडली होती मोठी रोकड
मुंबईत यापूर्वीही भुलेश्वरमध्ये देखील 1 कोटी 32 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं होतं. याचाही तपास पोलिसांनी सुरु केला होता. शिवाय पुण्यात देखील दोन ठिकाणी पोलिसांनी मोठं घबाड जप्त केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या