एक्स्प्लोर

Abhijeet Patil: तुतारी कडून उमेदवारी मिळताच अभिजित पाटील जरांगेंच्या भेटीला; माढ्यातील समीकरणं बदलणार? मराठा समाजाचा कौल ठरणार महत्त्वाचा

Abhijeet Patil: माढ्यातून उमेदवारीचा प्रयत्न सुरू करतानाही अभिजीत पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते.

माढा: माढ्याच्या उमेदवारीसाठी सुरू असलेला संघर्ष अखेर संपला. अभिजीत पाटील यांनी बाजी मारली आणि काल रात्री त्यांच्या हातात पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळाला. यानंतर अभिजीत पाटील यांनी तातडीने अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. अभिजीत पाटील आणि जरांगे पाटील यांचे संबंध खूप चांगले असून यामुळेच अभिजीत यांनी जरांगे यांना शरद पवार गटातून उमेदवारी मिळाल्याचे सांगितले जाते. माढ्यातून उमेदवारीचा प्रयत्न सुरू करतानाही अभिजीत पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. आता शरद पवार यांनी विश्वास दाखवल्यानंतर अभिजीत पाटील यांनी जरांगे यांची भेट घेतल्याने आता विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्या गटात उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. 

आमदार बबन शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार असून लोकसभा निवडणुकीत जरांगे इफेक्टमुळे माढा विधानसभेतून जवळपास 55 हजार मतांची पिछाडी महायुतीच्या उमेदवाराला मिळाली होती. यामुळेच सावध होत आमदार शिंदे यांनी अजितदादांची साथ सोडत आपण शरद पवार गटाकडून निवडणूक लढविणार किंवा अपक्ष लढवू मात्र महायुतीचे तिकीट घेणार नाही अशी जाहीर भूमिका घेतली होती. गेले आठ दिवस उमेदवारीसाठी ते शरद पवार यांच्याकडे सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र,अखेर शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्या हातात तुतारी सोपवली. 

काल (सोमवारी) बबनदादा शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यासाठी माढा शहरांमध्ये विराट रॅली घेत मुलगा रणजीत शिंदे याला तुतारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक रिंगणात उतरवायचे का असा सवाल कार्यकर्त्यांना केला होता. याचे कारणही तसेच होते जो जरांगे इफेक्ट माढा विधानसभेत दिसला होता ते पाहता कार्यकर्त्यांची भूमिका ही आमदार शिंदे यांनी तुतारी घेऊनच निवडणूक लढवावी अशी होती. मात्र पवारांनी डावल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली होती.  

काल (सोमवारी) रात्री शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट घेतल्यावर बबन शिंदे यांना पवारांनी स्पष्ट नकार दिला आणि त्यांची शरद पवार गटाची दार आता पूर्ण बंद झाली आहे. त्यामुळे आमदार शिंदे यांची आज भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष असून आज उमेदवारी दाखल करायचा शेवटचा दिवस आहे आणि अद्याप महायुतीने माढ्यातील उमेदवार जाहीर केलेला नाही. ही जागा अजित पवार गटात असली तरी जर अजित पवार गटाकडे सक्षम उमेदवार नसेल तर ती जागा शिंदे यांच्या शिवसेनेला पाहिजे आहे. शिंदे यांच्या गटाकडून ओबीसी नेते शिवाजी कांबळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असून आज अजित पवार काय भूमिका घेणार यावर माढ्यातील महायुतीचा उमेदवार निश्चित होणार आहे.

 सध्या तरी अभिजीत पाटील यांनी तुतारी जशी बाजी मारली तशीच जरांगे यांच्याशी भेट घेत एक पाऊल पुढे टाकले आहे. यंदा जरांगे पाटील महाराष्ट्रात काही ठिकाणी उमेदवार देणार असून माढ्यातून त्यांचे निकटवर्तीय धनाजी साखळकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. आता जरांगे माढ्याच्या बाबतीत काय निर्णय घेणार हे येत्या 30 तारखेला दिसणार असले तरी अभिजीत पाटील यांनी त्यांच्या भूमिकेला समर्थन देत जरांगे यांची भेट घेतल्याने माढा मतदारसंघातील मराठा मतदार कोणाला कौल देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?Zero Hour on Chatarapati Sambhajingar:छत्रपती संभाजीनगर बनतंय कचरा किंग, महापालिका तोडगा कधी काढणार?Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget