Sanjay Raut : मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
गाडीमध्ये तब्बल पाच कोटींची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच महाराष्ट्रामध्ये पैशाचा पाट वाहण्यास सुरुवात झाली आहे. आज पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड-शिवापूर (Khed shivapur) टोलनाक्यावर नाकाबंदी दरम्यान तब्बल पाच कोटी कॅश असलेली इनोव्हा क्रिस्टा पकडली आहे. पाच कोटींची कॅश सापडल्याने एकच खळबळ उडाली आहेत. ही गाडी सत्ताधारी पक्षातील एका आमदाराची असल्याचे बोलले जात आहे. या गाडीमध्ये तब्बल पाच कोटींची रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर या पैशाचा थेट अप्रत्यक्ष संबंध शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी असल्याचे सांगितले आहे.
मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले!
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 21, 2024
हे आमदार कोण?
काय झाडी…
काय डोंगर….
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास ७५ कोटी पाठवले
१५ कोटी चा हा पहिला हप्ता!
काय बापू..
किती हे खोके?
@ECISVEEP
@AmitShah
pic.twitter.com/tb7DuPWV3W
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, मिंधे टोळीतील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी सापडले! हे आमदार कोण? काय झाडी… काय डोंगर…. मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले 15 कोटी चा हा पहिला हप्ता! काय बापू.. किती हे खोके? संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केलं आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदी करत असतानाच पाच कोटींची रक्कम रक्कम आढळून आली. ही रक्कम सोलापूरला सांगोलाच्या दिशेने जात होती, अशी माहिती समोर येत आहे. पुण्यातून सोलापूरला जाण्यासाठी सरळ मार्ग असताना ही गाडी या मार्गाने का आली? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सापडलेल्या पैशाची पाहणी करण्यासाठी इन्कम टॅक्स तसेच पोलिसांकडून सुद्धा माहिती घेण्यास सुरू आहे. आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारासरी कारवाई करण्यात आली. नाकाबंदी करताना इनोवा क्रिस्टा कारमध्ये पाच कोटींची रक्कम सापडली असून गाडीचा मालक नलवडे असल्याचे समोर येत आहे. ही रक्कम सांगोला नेण्यात येणार होती.
इतर महत्वाच्या बातम्या