Maharashtra Loksabha Election : 'या' चार जागांवर अजून उमेदवार घोषित नाहीच! 26 जागांवर थेट लढती निश्चित; कोण कोणाविरुद्ध लढणार?
Maharashtra Loksabha Election : कल्याण, मुंबई उत्तर मध्य, पालघर आणि सातारा या ठिकाणी कोणत्याच पक्षाकडून उमेदवार घोषित न करण्यात आल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
![Maharashtra Loksabha Election : 'या' चार जागांवर अजून उमेदवार घोषित नाहीच! 26 जागांवर थेट लढती निश्चित; कोण कोणाविरुद्ध लढणार? Maharashtra Loksabha Election Four Constituency candidates have not been declared yet while 26 seats clear picture know the Who will fight against whom Maharashtra Loksabha Election : 'या' चार जागांवर अजून उमेदवार घोषित नाहीच! 26 जागांवर थेट लढती निश्चित; कोण कोणाविरुद्ध लढणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/b30eaebe2eb04a603b20129ce9e5f7981711777766719736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Loksabha Election : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही काथ्याकूट सुरूच असला तरी आतापर्यंत 26 लढतींमध्ये कोण कोणाविरुद्ध लढणार याचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यात आतापर्यंत भाजप, काँग्रेस, शिंदे गट, ठाकरे गट पक्षाकडून 61 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यानुसार 26 ठिकाणी लढती निश्चित झाल्या आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अजूनही 18 मतदारसंघांमध्ये एकच उमेदवार जाहीर करण्यात आला आहे, तर चार मतदारसंघांमध्ये अजून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत, अशी स्थिती आहे.
पूनम महाजन यांची उमेदवारी अजूनही गॅसवर
कल्याण, मुंबई उत्तर मध्य, पालघर आणि सातारा या ठिकाणी कोणत्याच पक्षाकडून उमेदवार घोषित न करण्यात आल्याने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष बाब म्हणजे भाजपने आतापर्यंत 24 उमेदवार घोषित केले आहेत. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून अजून उमेदवार घोषित केलेला नाही. या मतदारसंघांमध्ये पुनम महाजन यांची उमेदवारी अजूनही गॅसवर आहे. त्यांना रिंगणात उतरवलं जातं की नाही किंवा उमेदवार बदलला जाणार का? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. कल्याण आणि पालघरमध्ये सुद्धा तीच स्थिती आहे. कल्याणच्या बदल्यात ठाणे असा वाद महायुतीमध्ये रंगला आहे.
ठाण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपकडे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे पालघरच्या जागेवर शिंदे यांचे विद्यमान खासदार असल्याने ते त्या जागेसाठी आग्रही आहेत. सातारामध्ये सुद्धा शरद पवार यांनी चार नावे चर्चेत असल्याचे सांगत पत्ता उलघडलेला नाही. त्यामुळे याठिकाणी सुद्धा दोन दिवसात उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान 18 मतदारसंघांमध्ये एकच उमेदवार घोषित करण्यात आल्याने त्या ठिकाणी मात्र अजूनही विरोधातील उमेदवार कोण असणार याची स्पष्टता आलेली नाही.
शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक लढत कोणत्या ठिकाणी होणार ?
- बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना-शिंदे) वि. नरेंद्र खेडेकर (शिवसेना- ठाकरे)
- हिंगोली - हेमंत पाटील वि. (शिवसेना-शिंदे) वि. नागेश पाटील अष्टीकर (शिवसेना- ठाकरे)
- मावळ - श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे) वि. संजोग वाघेरे (शिवसेना-ठाकरे)
- शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिवसेना-शिंदे) वि. भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना-ठाकरे)
- मुंबई दक्षिण मध्य - राहुल शेवाळे (शिवसेना-शिंदे) वि. अनिल देसाई (शिवसेना-ठाकरे)
भाजप विरुद्ध काँग्रेस थेट कोणत्या ठिकाणी होणार?
- भंडारा गोंदिया - सुनील मेंढे (भाजप) वि. प्रशांत पडोले (काँग्रेस)
- चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप) वि. प्रतिभा - धानोरकर (काँग्रेस)
- गडचिरोली चिमूर - अशोक नेते (भाजप) वि. डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस)
- लातूर - सुधाकर श्रृंगारे (भाजप) वि. शिवाजीराव काळगे (काँग्रेस)
- नागपूर - नितीन गडकरी (भाजप) वि. विकास ठाकरे (काँग्रेस)
- नांदेड - प्रतापराव चिखलीकर (भाजप) वि. वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
- नंदूरबार - हीना गावित (भाजप) वि. गोवल पाडवी (काँग्रेस)
- पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजप) वि. रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
- अमरावती - नवनीत राणा (भाजप) वि. बळवंत वानखेडे (काँग्रेस),
- सोलापूर - राम सातपुते (भाजप) वि. प्रणिती शिंदे (काँग्रेस)
भाजप विरुद्ध शरद पवार गट लढत कोणत्या ठिकाणी होणार?
- बारामती - सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी अजित पवार) वि. सुप्रिया सुळे (शरद पवार गट)
- अहमदनगर - सुजय विखेपाटील (भाजप) विरूध्द नीलेश लंके (शरद पवार गट)
- शिरूर - आढळराव पाटील (राष्ट्रवादी अजित पवार) वि. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी- शरद पवार)
अन्य जाहीर झालेल्या लढती खालीलप्रमाणे होतील
- कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना-शिंदे) वि. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (काँग्रेस)
- मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) - मिहीर कोटेचा (भाजप) वि. संजय दिना पाटील (शिवसेना - ठाकरे)
- परभणी - महादेव जानकर (रासप) वि. संजय जाधव (शिवसेना-ठाकरे)
- रायगड - सुनील तटकरे (राष्ट्रवादी अजित पवार) वि. अनंत गीते (शिवसेना - ठाकरे)
- रामटेक - राजू पारवे (शिवसेना - शिंदे) वि. श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
- अकोला - अनुप धोत्रे (भाजप) विरूध्द प्रकाश आंबेडकर (वंचित)
- हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना शिंदे) वि. राजू शेट्टी (स्वाभिमानी पक्ष)
- सांगली - संजयकाका पाटील (भाजप) वि. चंद्रहार पाटील (शिवसेना - ठाकरे)
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)