Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: साताऱ्यातील मोठी अपडेट; शशिकांत शिंदेंची आघाडी, उदयनराजे भोसले पिछाडीवर, उलटफेर होणार?
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: देशभरासह महाराष्ट्रातील मतदानाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत.
Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: देशभरात लोकसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Lok Sabha Result) मतमोजणी सुरु झाली आहे. देशभरासह महाराष्ट्रातील मतदानाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. सातरा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. तर भाजप आणि महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. सकाळी 9 वाजता आलेल्या कलानूसार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत.
राज्यातील सर्वाधिक चर्चेतील मतदारसंघातील मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ (Satara Lok Sabha) सातारा लोकसभा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे गेला. भाजपनं राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे होता. महाविकास आघाडीतून विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) लोकसभेच्या रिंगणात होते. दोन्ही बाजूनं सातारा लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार प्रचार करण्यात आला.सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. साताऱ्यात 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
साताऱ्यातील मतदानाची आकडेवारी
सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. यामध्ये 18 लाख 89 हजार 740 मतदारांपैकी 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 67.59 टक्के इतके झाले. तर सर्वात कमी मतदान पाटण विधानसभा मतदार संघात 56.95 टक्के इतके झाले.
सातारा लोकसभेतील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी :
कोरेगाव : 2 लाख 11 हजार 680 मतदान, 67.59 टक्के
कराड उत्तर : 1 लाख 94 हजार 29 मतदान, 65.34 टक्के
कराड दक्षिण : 1 लाख 98 हजार 633 मतदान, 65.65 टक्के
पाटण : 1 लाख 70 हजार 616 मतदान, 56.95 टक्के
सातारा : 2 लाख 10 हजार 656 मतदान, 62.74 टक्के
वाई : 2 लाख 7 हजार 878 मतदारांनी मतदान, 60.83