(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Deshmukh : महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाला देवेंद्र फडणवीसच जबाबदार; अनिल देशमुख यांची बोचरी टीका
Anil Deshmukh : भाजपच्या पराभवात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचांच सर्वात जास्त हात असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली आहे.
Anil Deshmukh on Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा निकाल (Maharashtra Lok Sabha Election Result 2024) जाहीर झाला असून या निवडणुकीत महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aaghadi) जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातील सर्वत मोठा पक्ष ठरला आहे.
अशातच भारतीय जनता पार्टीच्या (BJP) पराभवाला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच सर्वात जास्त जबाबदार असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली आहे. अनेक ठिकाणी भाजपला अपेक्षीत असं यश मिळालं नाही. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. यावर बोलताना अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधत चांगलाच समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाला देवेंद्र फडणवीस जबाबदार!
देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली हे लोकांना आजिबात आवडलं नाही आणि यामुळेच महाराष्ट्रात भाजप अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. मी म्हणालो होतो महाराष्ट्रात चमत्कार होईल, आज तोच चमत्कार झाला आहे. राज्यात महावीकास आघाडीचे 30 खासदार निवडून आले आहेत. तर विदर्भातही मोठे यश मिळाले आहे. आगामी रणनीती वरिष्ठ नेते ठरवती आणि राज्यात जसा चमत्कार झाला, तसा केंद्रात देखील व्हायला पाहिजे. अशी अपेक्षाही अनिल देशमुख यांनी बोलताना व्यक्त केलीय.
भाजपला आधीच चिंतन मंथन करणं गरजेचं होतं
सध्या भाजपला मंथनाची गरज आहे. या पराभवाला खऱ्या अर्थाने जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी फोडाफोडीचे राजकारण केले, हे लोकांना आवडलं नाही आणि यामुळेच महाराष्ट्रात भाजप अपयशी ठरल्याचा दावाही अनिल देशमुख यांनी केला आहे. एकीकडे भाजप 45 प्लस बोलत असताना त्यांनी आधीच चिंतन मंथन करणं गरजेचं होतं. मात्र, आता बैठका घेऊन त्यांना काहीही उपयोग नाही. असा टोलाही अनिल देशमुख यांनी भाजपला लगावला आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
इतर महत्वाच्या बातम्या