Akola Lok Sabha Result 2024 : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भूमिका भाजपला पूरक होती; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप
Akola Lok Sabha : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही भाजपला पूरक होती. त्यातूनच त्यांनी निवडणुकीदरम्यान अनेकदा आपल्यावर वैयक्तिक टीका आणि आरोप केल्याचं खळबळजनक आरोप डॉ.अभय पाटील यांनी केला आहे.
Akola Lok Sabha Election Result 2024 अकोला : अकोल्यात पराभूत झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही भाजपला पूरक होती. त्यातूनच त्यांनी निवडणुकीदरम्यान अनेकदा आपल्यावर वैयक्तिक टीका आणि आरोप केल्याचं खळबळजनक आरोप डॉ. अभय पाटील (Abhay Patil) यांनी केला आहे. ते अकोला येथे 'एबीपी माझा' शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळेच मतदारांनी 2019 च्या तुलनेत आंबेडकरांचे मताधिक्य घटवल्याचा टोलाही अभय पाटील यांनी लगावलाय. दरम्यान आपल्या पराभवाचं आत्मचिंतन करून पुढची दिशा ठरवणार असल्याचेही अभय पाटील म्हणालेय.
अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भूमिका भाजपला पूरक
अकोल्यातून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. अभय पाटील यांचा पराभव केलाय. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील पराभूत झाले आहेत. चाळीशीतील अनुप धोत्रे या निवडणुकीत जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव केला. अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे याआधी सलग चार वेळेस खासदार झाले होते. मात्र संजय धोत्रे आजारी असल्याने यंदा अनुप धोत्रेंना भाजपनं मैदानात उतरवलं होतं. मात्र, विदर्भात नागपूरनंतर केवळ अकोल्यात भाजपला यश आले आहे.
अशातच अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही भाजपाला पूरक असल्याचा आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी केला आहे. संपूर्ण निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजप एवजी सर्वाधिक टीका ही आपल्यावरच केल्याचे डॉ. अभय पाटील म्हणाले आहेत. शिवाय अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही परस्परविरोधी भूमिका असल्याचेही ते म्हणाले आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
इतर महत्वाच्या बातम्या