मोठी बातमी : लोकसभेत धमाका केल्यानंतर काँग्रेस पुन्हा सज्ज; आता विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी उमेदवार जाहीर!
Congress Candidate For Legislative Council Election 2024: काँग्रेसनं विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश श्रीधर कीर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे.
Maharashtra Legislative Council Election 2024: मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा निकाल (Maharashtra Lok Sabha Election Result 2024) जाहीर झाला असून निवडणुकीत महाविकास आघाडीनं (Maha Vikas Aaghadi) जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच लोकसभेचं वारं थांबण्यापूर्वीच राज्यात विधान परिषदेच्या (Legislative Assembly Elections 2024) रणधुमाळीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषदेवरुन महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस रंगली आहे. तसेच, मनसेनंही कोकण पदवीधरमधून आपला उमेदवार जाहीर केला आहे. अशातच आता काँग्रेसनंही विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून रमेश श्रीधर कीर (Ramesh Keer) यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुका गाजवल्यानंतर काँग्रेसनं आता विधान परिषदेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसनं आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. रमेश श्रीधर कीर यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. सोमवारी रमेश कीर यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार हुसेन दलवाई, ज्येष्ठ काँग्रेस नेते आबा दळवी, राजेश शर्मा, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम गोकुळशेठ पाटील उपस्थित होते.
कशी पार पडणार विधान परिषदेची निवडणूक?
विधान परिषदांच्या निवडणुकीसाठी 31 मे रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. 7 जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी 10 जून रोजी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 12 जून आहे. 26 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत या चारही मतदारसंघांकरिता मतदान होईल. सोमवार 1 जुलै 2024 रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया 5 जुलै रोजी पूर्ण होणार आहे. संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे.
कोणत्या चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार?
- विलास विनायक पोतनीस - मुंबई पदवीधर (ठाकरे गट)
- निरंजन वसंत डावखरे - कोकण पदवीधर (भाजप)
- किशोर भिकाजी दराडे - नाशिक शिक्षक (ठाकरे गट)
- कपिल हरिश्चंद्र पाटील - मुंबई शिक्षक (लोकभारती)
मतदान आणि मतमोजणी कधी?
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य शिक्षक, तर 7 सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार 10 जूनला मतदान होणार असून 13 जूनला मतमोजणी होईल.