Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; 42 पैकी 20 ग्रापंपचायतीवर भाजपाचा झेंडा
Gram Panchayat Election Results 2022 LIVE Updates: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
मुंबई: राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा आज निकाल लागणार आहे...काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 74 टक्के मतदान झालंय.. राज्यात 34 ठिकाणी 616 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्यात. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.. कुण गुलाल उधाळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचातींसाठी 88 टक्के मतदान
कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता 474 पैकी 429 ग्रामपंचायतींसाठी (Kolhapur District Gram Panchayat Election) अत्यंत चुरशीने 84.08 टक्के मतदान झाले. राधानागरी तालुक्यात सर्वाधिक 8904. टक्के तर गडहिंग्लज तालुक्यात 77.01 टक्के सर्वात कमी मतदान झाले. जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतींसाठी 4 लाख 12 हजार 182 महिलांनी, 44 लाख 87 हजार 63 पुरुषांनी इतर असे एकूण 8 लाख 60 हजार 955 मतदारांनी मतदान केले.
नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतसाठी 79.63 टक्के
नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतसाठी 79.63 टक्के मतदान झाले असून 3 हजार 474 उमेदवारांचा आज फैसला होणार आहे. जवळपास 79.63 टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील एकूण 122 ग्रामपंचायतीसाठी 80.24% मतदान
जळगाव जिल्ह्यातील एकूण 122 ग्रामपंचायतीसाठी 80.24% एवढे मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेच्या तर्फे देण्यात आली आहे. सर्वाधिक मतदान जळगाव तालुक्यात 87.70 टक्के तर सर्वात कमी मतदान चोपडा तालुक्यात 73.36 टक्के झाले आहे. दरम्यान कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडलेला नाही, सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे - 35, पालघर - 62, रायगड - 191, रत्नागिरी - 163, सिंधुदुर्ग - 291, नाशिक - 188, धुळे - 118, जळगाव - 122, अहमदनगर - 195, नंदुरबार - 117, पुणे - 176, सोलापूर - 169, सातारा - 259, सांगली - 416, कोल्हापूर - 429, औरंगाबाद - 208, बीड - 671, नांदेड - 160, उस्मानाबाद- 165, परभणी - 119, जालना - 254, लातूर - 338, हिंगोली - 61, अमरावती - 252, अकोला - 265, यवतमाळ - 93, बुलडाणा - 261, वाशीम - 280, नागपूर - 234, वर्धा - 111, चंद्रपूर - 58, भंडारा - 304, गोंदिया - 345, गडचिरोली- 25. एकूण - 7,135.
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; 42 पैकी 20 ग्रापंपचायतीवर भाजपचा झेंडा
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील थेट सरपंच पदासाठी 34 ग्रामपंचायतीमध्ये 114 उमेदवारांसह 219 सदस्यांच्या जागांसाठी 613 उमेदवारांच्या अंतिम निकालात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. विशेष म्हणजे 42 पैकी 6 ग्रामपंचाती बिनविरोध झाल्या, तर दोन ठिकाणी सरपंच पदासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल न केल्या रिक्त आहेत. आज अंतिम निकालात सर्वाधिक 20 ठिकाणी भाजपाचे पॅनल निवडून आले. तर शिंदे गटाचे 13 पॅनल तसेच ठाकरे गटाचे पाच तर दोन ठिकाणी अपक्ष सरपंच निवडून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपाने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
Devendra Fadnavis: विदर्भ, कोकण सगळीकडे आमची सरसी झाली: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, आमच्या युतीला दणदणीत विजय मिळाला आहे. राज्यात 3 हजार 29 ग्रामपंचायती आमच्या आल्यात आहेत. विदर्भ, कोकण सगळीकडे आमची सरसी झाली आहे, असं ते म्हणाले आहेत.




















