(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates: ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान
Gram Panchayat Election Live Updates: राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असून, प्रचाराचा धुरळा उडलाय. 18 डिसेंबरला मतदान, तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
LIVE
Background
Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates: राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. काल रात्रीच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मतदानासाठी अवघे काही तास उरले आहेत. उद्या (18 डिसेंबरला) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
Pandharpur Gram Panchayat Election: वेळापूर ग्रामपंचायत रिंगणात तृतीयपंथी उतरल्याने रंगत वाढली
Pandharpur Gram Panchayat Election: माळशिरस तालुक्यातील वेळापूर हि सर्वात मोठी ग्रामपंचायत असून येथे राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांची सत्ता आहे . याच ग्रामपंचायत मधून सरपंचपदासाठी जनतेचा उमेदवार म्हणून तृतियपंथीय माया उर्फ सदाशिव रामचंद्र अडसूळ हे निवडणूक रिंगणात उतरल्याने रंगतदार प्रचार सुरु असून माया याने आपला जाहीरनामा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून जनतेत मते मागत फिरत आहे . या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी काट्याची टक्कर सुरु असताना मायाच्या उमेदवारीने वेळापूर सरपंचपदासाठी चुरस वाढल्याचे चित्र आहे .
Osmanabad Gram Panchayat Election: उस्मानाबाद जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक अवघ्या काही तासांवर आली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सध्या मेड इन चायना ईव्हीएम मशीन दाखल झाल्या असून.. मशीन होतकरू इच्छुक उमेदवार विकत घेताय गावागावात जाऊन सरपंच पदासाठी कोणाला निवडून द्यायचं वॉर्डातल्या कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं हे दाखवत आहे यासोबतच या वेळेस सरपंच पदाची निवड थेट जनतेतून असल्यामुळे कमालीची चुरस वाढली आहे मोबाईल म्हणजेच इंटरनेटच्या पेनेत्रेशन मूळ निवडणुकीच्या संदर्भात बदलून गेले व्हाट्सअप स्टेटस ठेवून उमेदवार आपला प्रचार करत आहेत वेगवेगळी साहित्य सुद्धा बाजारात आलेत पण खरी गंमत आहे ती मेड इन चायना ईव्हीएम डमी मशीनची.
Beed Gram Panchayat Election: बीडच्या क्षीरसागर कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या नवगण राजुरी मध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकी च्या प्रचाराचा धुमाकूळ पाहायला मिळतोय.. राजुरी ग्रामपंचायत साठी येथे 18 तारखेला मतदान होणार आहे एकूण 13 सदस्य आणि एक सरपंच अशा 14 जागेसाठी ही थेट लढत होणार आहे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटाच्या समोर जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे आव्हान असणार आहे..
या ग्रामपंचायत वर सध्या आमदार संदीप क्षीरसागर गटाचे वर्चस्व आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये राजुरी ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर गटाच्या ताब्यात राहते की जय दत्त श्री सागर गट आपल्या ताब्यात घेते हे पाहणं मोठे असल्याचे ठरणार आहे याच ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा आढावा घेतला
Baramati Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करण्यासाठी थेट दुबईहून बारामतीमध्ये
Baramati Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दामपत्य 80 हजार रुपये खर्चून दुबईहून बारामती तालुक्यातील गडदरवाडीला आले आहे. गडदरवाडीतील सचिन गोकुळ लकडे हे दुबईमध्ये विमानतळावर कामाला आहेत. ते मूळचे बारामती तालुक्यातील गडदरवाडी गावातील आहेत. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आपली पत्नी सरिता यांच्यासह थेट दुबईहून गडदरवाडीला दाखल झाले. त्यासाठी त्या दाम्पत्याला दोन्ही बाजू कडील विमान प्रवासासाठी तब्बल 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. मात्र असे असले तरी गाव कारभाराची धुरा योग्य व्यक्तीकडे जावी यासाठी मतदान करण्यासाठी आलो आहे.
Baramati Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करण्यासा थेट दुबईहून मतदानासाठी बारामती मध्ये
Baramati Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक दामपत्य 80 हजार रुपये खर्चून दुबईहून बारामती तालुक्यातील गडदरवाडीला आले आहे. गडदरवाडीतील सचिन गोकुळ लकडे हे दुबईमध्ये विमानतळावर कामाला आहेत. ते मूळचे बारामती तालुक्यातील गडदरवाडी गावातील आहेत. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आपली पत्नी सरिता यांच्यासह थेट दुबईहून गडदरवाडीला दाखल झाले. त्यासाठी त्या दाम्पत्याला दोन्ही बाजू कडील विमान प्रवासासाठी तब्बल 80 हजार रुपयांचा खर्च आला आहे. मात्र असे असले तरी गाव कारभाराची धुरा योग्य व्यक्तीकडे जावी यासाठी मतदान करण्यासाठी आलो आहे.
Beed Gram Panchayat Election: मतदान अधिकाऱ्यानेच दबाव टाकून मतदान करून घेतल्याचा सरपंच पदाच्या उमेदवाराचा आरोप
Beed Gram Panchayat Election: बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील साळेगाव येथे मतदान सुरू असताना मतदान अधिकाऱ्यानेच मतदारांवर दबाव टाकून मतदान करून घेतल्याचा आरोप सरपंच पदाचे उमेदवार दत्तात्रय इंगळे यांनी केला आहे त्यामुळे त्यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार देऊन बूथ क्रमांक एकमध्ये फेर मतदान घेण्याची मागणी केली आहे. साळेगाव येथील बुथ क्रमांक एकमध्ये असलेल्या मतदान अधिकाऱ्यांनी मतदारांच्या इच्छेविरुद्ध स्वतः मतदान केल्याचे फोटो त्यांनी तहसीलदार यांना पाठवले असून मतदारांना आपल्या इच्छेनुसार मतदान करता आलं नाही असं देखील तक्रार इंगळे यांनी केली आहे
Nashik Gram Panchayat Election: नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतीसाठी एकूण 79.63 टक्के मतदान
Nashik Gram Panchayat Election: नाशिक जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून एकूण 79.63 टक्के मतदान झाल्याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. जिल्ह्यात सुरगाणा वगळता 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. यातील 08 ग्रामपंचायत बिनविरोध ठरल्या होत्या.
बिनविरोध आठ ग्रामपंचायती खालीलप्रमाणे
बागलाण तालुका - किकवारी बु, ढोलबारे महड.. नाशिक तालुका, कोटमगाव.. चांदवड तालुका - नारायणगाव.. कळवण तालुका - जयपूर.. नांदगाव तालुका - शास्त्रीनगर.. दिंडोरी - जालखेड.
मंगळवारी मतमोजणी होणार असून सर्वच उमेदवारांची आता धाकधूक वाढलीय.
Beed Gram Panchayat Election: राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या शिराळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीवरून हाणामारी
Beed Gram Panchayat Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या शिराळ गावात ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागले आहे. परवा दिवशी जुन्या वादातून दोन गटात मारामारी झाली. सचिन आजबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिराळमधल्या चौकामध्ये संग्राम आजबे महेश आवे आणि आमदार बाळासाहेब आजबे यांचे पुत्र यश यांच्यासह 50 जणांनी मारहाणी केल्याचा आरोप आहे. बाळासाहेब आजबे गटाकडून सुद्धा सचिन आजबे च्या विरोधात मारहाणीच्या तक्रार दिली आहे त्यानुसार सचिन आजबे ज्ञानेश्वर आजबे यांच्यासह 32 जनावर गुन्हे दाखल झाले आहेत