एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, मी 25000 मतांच्या फरकानं विजयी होणार, संतोष बागरांना विश्वास
एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी व्यक्त केले. तर मी 25000 मतांच्या फरकानं विजयी होणार असल्याचा विश्वास संतोष बांगर म्हणाले.
Santosh Bangar : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, पुढील 5 वर्षासाठी राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार असेल असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी व्यक्त केला. बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 25 हजार मतांच्या फरकाने माझा विजय होईल, असा विश्वास देखील बांगर यांनी व्यक्त केला.
सकाळी सात वाजल्यापासून माझा मतदारसंघात रेग्युलर दौरा सुरु झाला आहे. सकाळी नऊ वाजता एक उद्घाटन केलं आहे. 11 वाजता एक उद्घाटन केलं. मतदारसंघातील माझे सर्व कार्यकर्ते अपडेट घेऊन येत आहेत की आमच्या मतदारसंघांमध्ये सर्कलमध्ये गावामध्ये जे आकडेवारी आहे त्याबद्दल विचारपुस सुरू असल्याचे बांगर म्हणाले. विरोधकांना दुसरा काही धंदा नव्हता त्यांना माहित होतं की संतोष बांगर सर्वसामान्य जनतेमध्ये काम करणारा व्यक्ती आहे. ज्या ज्या ठिकाणी ते प्रचाराला जात होते माझ्या मुस्लिम समाजाच्या एका मौलांनी संतोष टारफे यांना वापस पाठवले कशासाठी आमच्याकडे आले असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याचे बांगर म्हणाले.
माझा नेता एकनाथ भाई शिंदे
माझा जो नेता आहे सन्माननीय एकनाथ भाई शिंदे यांचा आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी आहे. मला 9 तारखेला साहेबांनी सभा दिली होती. परंतू मी 9 तारखेला माझ्याकडे अमित शाह साहेब आहेत मी सभेचे नियोजन कसं करु. तेव्हा साहेबांनी सांगितलं आपण पुढे सभा घेऊ. त्यामुळे मला वाटते की साहेबांचा आशीर्वाद असल्यानंतर मला सभेची काय आवश्यकता आहे असे बांगर म्हणाले. ज्या पद्धतीने माझ्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती. त्यामुळं 100 टक्के आम्ही निवडणूक जिंकणार असल्याचे बांगर म्हणाले. शिवाजी माने यांच्यावर बोलण्यासारखं असं काहीच नाही. आपण बोलूनही काही फायदा नाही. माने साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर एखादं लहान लेकरू बरं त्यांचा कोणताही पक्ष राहिलेला नाही. आता ते ज्या पक्षांमध्ये आहेत मला वाटतं तिसऱ्यांदा त्या पक्षामध्ये गेले आहेत. आता मी इथेच मरणार म्हणतात कोणीतरी पाच 25 लाख रुपये दिले तर पुन्हा त्या पक्षात जायचं काहीतरी शरम काहीतरी लाज आहे का? असे म्हणत बांगर यांनी त्यांच्यावर टीका केली.
गुलाल आम्हीच उधळणार
मला माझ्या मायबाप जनतेवर विश्वास आहे माझी निवडणूक संतोष बांगरने लढवली नाही ही निवडणूक मतदारसंघातील गरीब जनतेने हातात घेतली होती. मायबाप जनतेवर माझा विश्वास आहे. 23 तारखेला धनुष्यबाणाचा गुलाल आम्हीच उधळणार आहे यात कुठलाही दुमत नाही असे बांगर म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच होतील. महाराष्ट्राचं भलं करायचं असेल तर ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विकास सुरु आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एवढा विकास कधी झाला नाही तो विकास सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या काळामध्ये अडीच वर्षात झाल्याचे बांगर म्हणाले. कळमनुरी मतदारसंघातून 25000 मतांनी माझा विजय निश्चित असल्याचे बांगर म्हणाले. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पाच वर्षासाठी महायुतीचं सरकार येणार असल्याचे बांगर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: