एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना जबर धक्का, जाहीर केलेला उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार!

Uddhav Thackeray : आता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. जाहीर केलेल्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली असून शिंदे गटात प्रवेश करणार आहे. 

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्या लढत पाहायला मिळणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) मोठा धक्का बसला आहे. जाहीर केलेल्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली असून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजीनगर मध्य मतदारसंघात किशनचंद तनवाणी (Kishanchand Tanwani) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने प्रदीप जैस्वाल (Pradeep Jaiswal) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघात एमआयएम (MIM) कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एमआयएमकडून नासेर सिद्दिकी (Naser Siddiqui) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी 'एक्स'वर पोस्ट करीत त्यांचे नाव जाहीर केले आहे. 

किशनचंद तनवाणी शिंदे गटात करणार प्रवेश 

यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात तिरंगी लढत होणार होती. मात्र, आता शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात 2014 सारखी परिस्थिती म्हणजे एमआयएमचा उमेदवार निवडून येवू नये म्हणून माघार घेत असल्याचे किशनचंद तनवाणी यांनी म्हटले आहे. जाहीर केलेल्या उमेदवाराने अचानक माघार घेतल्याने हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर किशनचंद तनवाणी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेच्या तोंडावर मोठा भूकंप पहायला मिळत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

NCP Sharad Pawar Candidate List : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चौथी यादी, सात उमेदवारांच्या नावाची घोषणा

भाजपची 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; राम सातपुतेंना उतरवलं, नुकतेच प्रवेश केलेल्या नेत्यालाही संधी

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujabal : भूमिका भुजबळांची, कोंडी अजितदादांची?
Jarange Bhujbal spat: मनोज जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा जुंपली
Navi Mumbai Airport Update | मंजुरी ते बांधकाम; असं तयार झालं नवी मुंबई विमानतळ
PM Modi Mumbai Visit | विकासाचा टेक ऑफ, मुंबईला दोन गिफ्ट
TOP 25 Superfast News : टॉप 25 बातम्या : 08 OCT 2025 : ABP Majha : Maharashtra News

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
Navi Mumbai International Airport: ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
रोहित शर्माची नवी कोरी टेस्ला कार, फ्रंट सीटवर बसून मारली राईड; गाडीचा नंबर खास; काय आहे मागील स्टोरी?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
राज्यातील समर्थ सहकारी बँकेला RBI चा दणका, ठेवीदारांमध्ये संताप; बँकेचे अध्यक्ष समोर आले, नेमकं काय म्हणाले?
Embed widget