देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपद तर मेघना बोर्डीकरांना मंत्रीपद मिळावं, परभणीत भाजप पदाधिकाऱ्यांदा महादेवाला साकडं
परभणीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि भाजप आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) मंत्री व्हाव्यात यासाठी महादेवाला साकडं घातलं आहे.
![देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपद तर मेघना बोर्डीकरांना मंत्रीपद मिळावं, परभणीत भाजप पदाधिकाऱ्यांदा महादेवाला साकडं Maharashtra Assembly Election Results 2024 Devendra Fadnavis should be made Chief Minister again and Meghna Bordikar should be given a ministerial post BJP Workers bearers in Parbhani pray to Mahadev देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्रीपद तर मेघना बोर्डीकरांना मंत्रीपद मिळावं, परभणीत भाजप पदाधिकाऱ्यांदा महादेवाला साकडं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/27/63c6eb40d3ca0e921daa3d63290bf54a1732691418063339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Parbhani News : राज्यात महायुतीला (Mahayuti) मोठं यश मिळालं आहे. 230 हून अधिक जागी महायुतीचे उमेदवार विजय झाले आहेत. त्यामुळं राज्यात सत्ता स्थापनेचा महायुतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, अशातच राज्याचा नवा मुख्यमंत्री (New Chief Minister) कोण होणार? याची मात्र, जोरदार चर्चा सुरु आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या काही नेत्यांनी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, परभणीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि भाजप आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) मंत्री व्हाव्यात यासाठी ग्रामदैवत जब्रेश्वर महादेवाला अभिषेक करत साकडे घातले आहे. भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हा अभिषेक केला आहे.
महायुती सरकारचा शपथविधी 29 नोव्हेंबरला होण्याची शक्यता
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 26 तारखेला होणार अशी चर्चा होती. मात्र 26 तारीख कालच होऊन गेली. आता सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनूसार महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी 29 नोव्हेंबरला होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या शपथविधी सोहळ्यात भाजपचे 25 आमदार, तर शिवसेना शिंदे गटाचे 5 ते 7 आमदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 5 ते 7 शपथ घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी निवडणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु आता नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नव्हे, तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार, याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता
महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार, ही निवडण्याची मोठी जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे आहे. आज संध्याकाळी दिल्लीत होणाऱ्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत भाजपला मिळालेले मोठे यश आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मिळालेल्या यशानंतर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रपी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, जोपर्यंत नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, रयत क्रांती संघटनेचं विठुरायाला साकडं. दुग्धअभिषेक करत पंढरपुरात वाटले पेढे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)