युगेंद्र पवारांची अजित पवारांशी तुलना होऊ शकत नाही, बारामतीच्या निकालावर नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Sharad Pawar : बारामती विधानसभा मतदारसंघातील निकालाबाबत शरद पवार यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नसल्याचे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत बारामती विधानसभा निवडणुकीकडं सर्वाचं लक्ष लागलं होतं. या मतदारंसघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे सख्खे पुतणे युग्रेंद्र पवार (Yugendra Pawar) निवडणूक लढवत होते. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) 1 लाख मताहून अधिक मताधिक्क्यानं विजयी झाले आहे. याबाबत प्रथमच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघातील निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
बारामती विधानसभा मतदारसंघात कोणीतरी उभं राहायला हवं होतं. कोणी उभा राहिलं नसतं तर महाराष्ट्रात काय संदेश गेला असता? असे शरद पवार म्हणाले. आम्हाला माहित होते की अजित पवार आणि युग्रेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही असेही पवार म्हणाले. गेल्या अनेक वर्षांचं अजित पवारांचा संघटन, त्यांचे सत्तेतलं स्थान एका बाजूला होतं आणि दुसऱ्या बाजूला एक नवखा तरुण होता असे अजित पवार म्हणाले. त्यामुलं आम्हाला त्याची कल्पना होती असेही शरद पवार म्हणाले. शरद पवार हे सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
राज्यातील लोकांनी जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य
विधानसभा निवडणुकीत राज्यातील लोकांनी जो निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य असल्याचे यावेळी शरद पवार म्हणाले. निकालाच्या संदर्भात आम्ही अभ्यास करणार आहोत. पुन्हा लोकांपुढे जाणार असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. यूपीतून आलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या प्रचाराचा मतदारांवर परिणाम झाल्याचं पवारांनी मान्य केलं आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मतं मिळाली असंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी कराडमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम झाल्याचं दिसतंय असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, निकाल काहीही लागला असला तरी आम्ही महाराष्ट्राचा नावलौकीक, सामाजिक बांधिलकी बिघडू देणार नाही असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Sharad Pawar : महाराष्ट्राची निवडणूक का हरलो? पवारांनी सांगितले पाच मुद्दे, यूपीच्या आदित्यनाथ यांचा 'बटेंगे तो कटेंगे' चा प्रभाव मान्य केला