एक्स्प्लोर

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेत नसतील, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दोन या महाराष्ट्राचे दोन दुश्मन असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

Sanjay Raut on PM Narendra Modi  : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे दोन या महाराष्ट्राचे दोन दुश्मन असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. दोघांनाही महाराष्ट्राचा विकास झालेला नको आहे. मराठी माणसाचा विकास झालेला यांना नको असल्याचे राऊत म्हणाले. सगळ्या गोष्टी हे दोघं महाराष्ट्रातून गुजरातमध्ये घेऊन जातात आणि महाराष्ट्राला कंगाल करून ठेवत असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्र जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल, तेव्हा नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत नसतील लिहून घ्या असं मोठं वक्तव्य देखील राऊतांनी केलं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यापुढे तुमच्या 50 लोकांचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही असेही राऊत म्हणाले. 

शिवाजीनगर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांच्या प्रचारासाठी संजय राऊत पुण्यात आले होते, त्यावेळी बोलत होते. लोकांनी ठरवलं आहे की बहिरट यांना विजयी करायचं आहे. महाविकास आघाडी मजबुतीने पुढे चालली आहे. महायुतीसारखी घाण महाराष्ट्रात राहता कामा नये अशी टीकाही राऊतांनी केली. श्रीमंतांच्या गाडीखाली गरिबांची मुलं मारली जातात आणि श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्यासाठी आमदार कामाला लागतो असे म्हणत नाव न घेता राऊतांनी सुनील टिंगरेवर टीका केली. बेईमान आणि गद्दारांचा राज्य राज्यात चालू आहे असेही ते म्हणाले. 

एकनाथ शिंदेपासून अजित पवारापर्यंत सगळे डरपोक लोक, घाबरुन पळून गेले

देशाच्या पंतप्रधानांना पुण्यात रिकामा खर्च्यासमोर भाषण करावे लागवे, यापेक्षा वेगळे दुर्दैव नाही असेही राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघं सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये घेऊन जातात आणि महाराष्ट्राला कंगाल करून ठेवत आहेत. राज्यातील नेत्यांना लाज वाटली पाहिजे जे मोदी आणि अमित शाह यांचे बूट चाटतात अशा शब्दात राऊतांनी टीका केली. प्रफुल्ल पटेलांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदेपासून भावना गवळीपर्यंत सगळ्यांवर सीबीआयचे आरोप केले होते. एकनाथ शिंदेपासून अजित पवारापर्यंत सगळे डरपोक लोक आहेत ते घाबरून पळून गेल्याचे राऊत म्हणाले.

कोण फडणवीस कोण एकनाथ शिंदे आणि कोण अमित शाह हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य

कोण फडणवीस कोण एकनाथ शिंदे आणि कोण अमित शाह हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. हे शाहू फुले आंबेडकरांचे राज्य आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच राज्य आहे असे संजय राऊत म्हणाले. या निवडणुकीत दादागिरी करण्याचा प्रयत्न कराल तर निवडणूक आयोगाला माझा आवाहन आहे की तुम्ही लक्ष घाला. दादागिरी आणि मारामारी करण्यात आमचं आयुष्य गेलं असल्याचेही राऊत म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

कोथरुडमध्ये भूमिपुत्राला निवडून द्या, कोल्हापूरचं पार्सल परत पाठवा, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget