Khadakwasla Assembly Election 2024 : खडकवासला विधानसभेत भाजपचे भीमराव तापकीर यांनी मारला चौकार? पुन्हा एकदा भाजपने उधळला गुलाल, किती मतांनी झाला विजय
Khadakwasla Assembly Election 2024 : पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघात भाजपच्या भीमराव तापकीर यांनी विजय प्राप्त केला आहे.
Khadakwasla Assembly Election 2024 : खडकवासला मतदारसंघात 2009 पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे त्यापाठोपाठ शिवसेनेची सत्ता होती. हा मतदारसंघ गेल्या तीन टर्मपासून भाजपकडे आहे. पुणे जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक मतदारसंघ आपल्याच बाजुने राखण्यात त्यांना मोठं यश आलं आहे. तर पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघात भाजपच्या भीमराव तापकीर यांनी विजय प्राप्त केला आहे.
खडकवासलात सचिन दोडके (राष्ट्रवादी - शरद पवार), भीमराव तापकिर (भाजप), मयूरेश वांजळे (मनसे) अशी तिरंगी लढत झाली होती. खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, गेल्या तीन निवडणुकांपासून भाजपने आपलं वर्चस्व दाखवत विजय मिळवला आहे. भाजपने आता विजयाचा चौकार मारला आहे.
मतदारसंघातील चित्र स्पष्ट
खडकवासला विधानसभा मतदासंघातून 20 फेऱ्यानंतर भीमराव तापकीर यांना तब्बल 41264 मतांची आघाडीवर आहेत. भीमराव तापकीर यांना 131978 मतं तर सचिन दोडके यांना 90713 मतं मिळाली आहेत. गेल्या तीन निवडणुकांपासून भाजपने आपलं वर्चस्व दाखवत विजय मिळवला आहे. भाजपने आता विजयाचा चौकार मारला आहे.
खडकवासला मतदारसंघात कशी आहे परिस्थिती
भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर चौथ्यांदा हॅटट्रिक मारण्याच्या तयारीत होते, त्यांनी मोठी तयारी देखील केली होती. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सचिन दोडके यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी अवघ्या दोन - अडीच हजार मतांनी त्यांचा केला होता.
खडकवासला मतदारसंघाची 2009 मध्ये निर्माण झाल्यानंतर दिवंगत आमदार रमेश वांजळे यांनी मनसेकडून निवडणूक लढवून विजय मिळवला. 2011मध्ये त्यांचे अकाली निधन झाले, त्यानंतर पोटनिवडणूक पार पडली. त्यावेळी भाजपने माजी नगरसेवक भीमराव तापकीर यांच्यावरती ही जबाबदारी दिली. वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांच्याविरोधात तापकीर 3625 मतांनी जिंकले. वांजळेंच्या पराभवानंतर खडकवासला मतदारसंघ भाजपच्या हाती आला.
खडकवासला मतदारसंघात भाजप पक्षाला मानणारा मोठा मतदार आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये सलग तापकीर वजय मिळवत आले आहेत. 2011 नंतर 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये ते विजयी झाले होते. आता चौथ्यांदा हॅटट्रिक साधण्यासाठी तयारी केली असताना मित्रपक्षांच्या मागणीमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
2019 ला मिळालेले मताधिक्य
भीमराव तापकीर - 120518
सचिन दोडके - 117923