Partur Vidhan Sabha Election Result : परतूर मतदारसंघात भाजपाचा बोलबाला, बबनराव लोणीकर यांची ए जे पाटलांवर मात
जालना जिल्ह्यातील परतूर या मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शेवटी या जागेवरचा निकाल आता स्पष्ट झाला आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024 Result) निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 25 नोव्हेंबर रोजी महायुतीच्या नेत्याचा मुख्यमंत्रिपदासाठी शपथविधी होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत जालना जिल्ह्यातील परतूर या मतदारसंपघाची सगळीकडे चर्चा रंगली होती. या जागेवर कोण बाजी मारणार असे विचारले जात होते.
2024 सालच्या निवडणुकीत कोणी बाजी मारली?
या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील ए जे पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे बबनराव लोणीकर यांच्यात प्रमुख लढत झाली. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार या मतदारसंघातून बबनराव लोणीकर यांचा 4740 मतांच्या फरकाने विजय झाला. त्यांना एकूण 70659 मते मिळाली. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे ए जे पाटील यांचा 4740 मतांनी पराभव झाला. त्यांना एकूण 65919 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार जेथलिया सुरेशकुमार कन्हैयालाल हे राहिले. त्यांना एकूण 53921 मते मिळाली.
राज्यात काय स्थिती?
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतीय जनता पार्टीचा आतापर्यंत 96 जागांवर विजय झाला आहे. तर हा पक्ष आणखी 37 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजेच भाजपाच जवळपास 133 जागांवर विजय होऊ शकतो. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा पक्ष आतापर्यंत 46 जागांवर विजयी झाला आहे. तर 11 जागांवर हा पक्ष आघाडीवर आहे. म्हणजेच हा पक्ष एकूण 57 जागांवर विजयी होऊ शकतो. अजित पवार यांच्या पक्षाने आतापर्यंत 36 जागांवर विजय मिळवला असून हा पक्ष आणखी 5 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजेच हा पक्ष एकूण 41 जागांवर विजयी होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा 18 जागांवर विजय झाला असून हा पक्ष आणखी 2 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजेच हा पक्ष एकूण 20 जागा जिंकू शकतो. शरद पवार यांच्या पक्षाला एकूण 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाला एकूण 10 जागा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर महायुतीने राज्यातील महिला, शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा निकाल अविश्वसनीय असल्याचे मत नोंदवले आहे.
हेही वाचा :