(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Badnapur Vidhan Sabha constituency : जालन्यातील बदनापूरमध्ये नारायण कुचेंचा दणदणीत विजय, बबलू चौधरी पराभूत!
Badnapur Vidhan Sabha constituency : जालना जिल्ह्यातील बदनापूर हा मतदारसंघ चांगलाच होता. या जागेवरून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
Badnapur Vidhan Sabha constituency : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) देशभरात चर्चा होती. या निवडणुकीत मराठवाड्याच्या जागांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. कारण मराठवाड्यातच ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आंदोलनाची बिजं रुजलेली आहेत. दरम्यान, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील बदनापूर या जागेवर नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शेवटी या जागेचा निकाल समोर आला आहे. येथे नारायण कुचे यांचा दणदणीत विजय झाला आहे. तर बबलू चौधरी यांचा पराभव झाला आहे.
2024 सालचा नेमका निकाल काय?
जालना जिल्ह्यातील बदनापूर या जागेवर चांगलीच चुरशीची लढत झाली. येथे भारतीय जनता पार्टीने नारायण कुचे यांना तिकीट दिले होते. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बबलू चौधरी यांना तिकी देण्यात आले होते. ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार होते. वंचित बहुजन आघाडीकडून सतीश खरात यांना तिकीट देण्यात आले होते. दरम्यान, येथे नारायण कुचे यांनी बबलू चौधरी यांना पराभूत केले आहे. साधारण 40 हजार मतांच्या फरकाने नारायण कुचे यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे.
2019 साली जिल्ह्यावर भाजपाचे वर्चस्व
जालना जिल्ह्यात शिंदे गटाचे अर्जुन खोतकर, भाजपाचे रावसाहेब दानवे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश टोपे आदी महत्त्वाचे नेते आहेत. या तिन्ही नेत्यांनी मंत्रिपद भूषवलेलं आहे. त्यामुळेच जालना जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. 2019 साली जिल्ह्यातील 5 पैकी 3 विधानसभेवर भाजपचे वर्चस्व राहिले. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात भाजपचाच या मतदारसंघावर वरचस्मा राहिला. दरम्यान, यावेळी बदनापूर या मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. येथे पुन्हा भाजपाने आपला झेंडा फडकावला आहे.
2019 साली नेमकं काय घडलं होतं?
2019 साली या जागेवर भाजपाने नारायण कुचे यांना तिकीट दिले होते. तर राष्ट्रवादी (संयुक्त) पक्षाकडून रुपकुमार चौधरी यांना तिकीट देण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र मगरे यांनी बदनापूरमधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत कुचे यांना 105312 मते पडली होती. तर चौधरी यांना 86700 मते मिळाली होती. वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. मगरे यांना 9869 मते मिळाली होती. कुचे यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण 49.8 टक्के तर चौधऱी यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण 41 टक्के होते.
हेही वाचा :
Jalna Vdhan Sabha Election 2024 : जालना मतदारसंघात कोणाची ताकद, महायुती जिंकणार की मविआ मारणार बाजी?