Kopargaon Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : कोल्हे कुटुंबियांचे बंड शमले! कोपरगाव विधानसभात आशुतोष काळेंविरोधात मविआ कोणाला उतरवणार
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Kopargaon Assembly Constituency 2024 : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील अनेक मतदार संघांमध्ये महायुतीमध्येच महानाट्य पाहायला मिळत आहे. यापैंकी सर्वांचे लक्ष लागले होते ते अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघात. कोपरगाव विधानसभा मतदासंघात अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांच्याविरोधात भाजपसोबत असलेल्या कोल्हे कुटुंबियांनी बंड पुकारले होते. मात्र स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांचे बंड थोपवण्यात भाजपला यश आले आहे. त्यामुळे कोपरगावमध्ये आशुतोष काळे यांच्याविरोधात मविआ कोणाला मैदानात उतरवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोपरगाव तालुक्याचे राजकारण हे माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि माजी खासदार शंकरराव काळे यांच्याभोवतीच फिरते. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते होते तसेच ते 35 वर्ष आमदारही होते. तर अशोक काळे हे 2004 आणि 2009 मध्ये आमदार होते. त्यानंतर त्यांचे चिरंजीव आशुतोष काळे हे विधानसभेच्या रिंगणात उतरले.
2014 मध्ये आशुतोष काळे हे विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. मात्र त्यांना पराभव स्विकारावा लागला. या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांच्या सूनबाई स्नेहलता कोल्हे या विजयी ठरल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा काळे आणि कोल्हेंमध्ये चुरस पाहायला मिळाली होती. 2019 ला भाजपकडे असलेला मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेला. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आशुतोष अशोकराव काळे यांनी स्नेहलता कोल्हेंना पराभूत करत कोपरगावमध्ये विजयाची बाजी मारली होती. आशुतोष काळे 87, 566 मतांनी विजयी झाले होते.