गद्दार सोडून गेले तरी सामान्य जनता पवार साहेबांच्या पाठीशी, नाव न घेतला हर्षवर्धन पाटलांचा अजित पवारांसह भरणेंना टोला
Harsh Vardhan Patil : शरद पवार साहेबांनी (Sharad Pawar) ज्यांना सर्व काही दिले ते माझ्या विरोधात असल्याचे वक्तव्य माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलं.
Harsh Vardhan Patil : शरद पवार साहेबांनी (Sharad Pawar) ज्यांना सर्व काही दिले ते माझ्या विरोधात आहेत. पण ज्यांना काही दिले नाही ती माणसं आपल्या पक्षात प्रवेश करत असल्याचे वक्तव्य माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते हर्षवर्धन पाटील (Harsh Vardhan Patil) यांनी केलं. सर्व काही देऊन सुद्धा ही माणसं पवार साहेबांच्या विरोधात काम करत आहेत, असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी नाव न घेता अजित पवारांसाह (Ajit Pawar) दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्यावर टीका केली. गद्दार सोडून गेले तरी सामान्य जनता पवार साहेबांच्या पाठीशी असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
एखादं नेतृत्व अडचणीत आले की त्यांना सोडून जायचं आणि आपला स्वार्थ कसा साधेल असा एक प्रवर्ग राज्यात आणि तालुक्यात तयार होत आहे. पण असे कितीतरी गद्दार पवार साहेबांना सोडून गेले तरी जोपर्यंत या महाराष्ट्रातील सामान्य जनता पवार साहेबांच्या मागे उभा आहे तोपर्यंत राज्यात महाविकास आघाडीच सरकार आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास हर्षवर्धन पाटलांनी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला.
पहिल्या कँबिनेटमध्ये धनगर आरक्षणावर निर्णय करणार होते, त्याचं काय झालं?
काही नेते म्हणाले होते आमचं सरकार येऊ द्या पहिल्या कँबिनेटमध्ये धनगर आरक्षणावर आम्ही निर्णय करु. आता किती कॅबिनेट झाल्या, दर आठवड्याला कॅबिनेट, झाला का निर्णय ? आता काहीतरी नविन स्टेटमेंट आलेय बटेंगे तो कटेंगे, हे कशाचे प्रतिक आहे. तुम्ही का इतर समाजाला टार्गेट धरता ? असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता टीका केली. रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे पुणे जिल्हा सरचिटणीस संदीपान कडवळे यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. याकाळात नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करताना दिसत आहेत. अशातच शरद पवार गटाचे इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली. या मतदारसंघात पुन्हा एकदा दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील यांच्यात सामना होत आहे.
महत्वाच्या बातम्या: