एक्स्प्लोर

महाराष्ट्रात महायुतीचचं सरकार येणार, फडणवीसांना विश्वास, म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा भाजप आणि मित्रपक्षाला फायदा होतो

महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा भाजप आणि मित्र पक्षालाला त्याचा फायदा होतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. आजवरचा अनुभव आहे की, जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा भाजप आणि मित्र पक्षालाला त्याचा फायदा होतो असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. मला विश्वास आहे की त्याचा फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार स्थापन होईल असे फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावरुन मुंबईला रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली

यावेळी महिलांचा देखील मतदानाचा टक्का वाढल्याचं दिसत आहे. मी काही मतदारसंघात संपर्क केले, तिथून मला फीडबॅक मिळाला आहे की महिलांची मतदानाची टक्केवारी वाढल्याचे फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची मतदारांची टक्केवारी वाढल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे देखील फडणवीस म्हणाले. आम्ही अजूनही कोणत्याही अपक्ष उमेदवाराशी संपर्क साधला नसल्याचे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्रीपदा संदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. परवा निकाल आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष बसू आणि चांगला निर्णय करु अशी माहिती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मतदानाची टक्केवारी ज्या पद्धतीने वाढली आहे, कारण लोकांना सरकारबद्दल थोडी आपुलकी वाटते असं त्याचा अर्थ असल्याचे फडणवीस म्हणाले. 

राज्यात विक्रमी मतदान, 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत

राज्यात विधानसभा निवडणुकीत मतदारांनी 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत काढताना भरभरून मतदान केलं आहे. 2024 च्या सर्वात लक्षवेधी आणि राजकारणाची खिचडी झाली असतानाच 65.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. दोन्ही पक्षांचे मतदार घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे. राज्यातील मतदानाचा उच्चांक कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) झाला असून 76 टक्के मतदान झालं आहे. राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात 84.79 टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, मतदानानंतर काल एक्झिट पोल आले आहेत. यानुसार महायुतीच्याच जागा जास्त येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या याबाबतची खरी परिस्थिती 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वासParali Beed Public Reaction on Polls : राज्यात मतदानाची वेळ संपली, परळीकरांचा कौल कुणाच्या बाजूने?Thane Public Reaction on Election : ठाण्यात शिंदेंना मनसे महागात पडणार? जनतेची बेधडक उत्तरं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
हसन मुश्रीफांनी काॅलर उडवत शड्डू ठोकला; कागलच्या गैबी चौकात मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष!
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Embed widget