एक्स्प्लोर

युगेंद्र पवारांनी पैसे वाटल्याची तक्रार, निवडणूक आयोगाचं सर्च ऑपरेशन, नेमकं काय सापडलं?

बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पावरांच्या शरयू मोटर्स या ठिकाणी पैसे वाटप करण्यात आल्याची तक्रार केली होती. याबाबत निवडणूक आयोगाने सर्च ऑपरेशन केले आहे.

Baramati Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तोफा कालच थंडावल्या आहे. विधानसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. अशातच .  युगेंद्र पावरांच्या शरयू मोटर्स (Sharyu Motors office) या ठिकाणी पैसे वाटप करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. माहिती मिळाल्यानंतर लगेच, निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले होते. यावेळी त्यांना काहीही आढळून आले नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले.

निवडणूक अधिकारी वैभव नावडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्याकडे पैसै वाटप होत असल्याबाबत तक्रार आली होती. त्यानुसार आम्ही शरयू माटार्स या ठिकाणी तपासणी केली होती. पण त्या ठिकाणी आम्हाला काहीही आढळून आले नसल्याचे नावडकर म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार?

बारामती शहरापासून जवळस असलेलं शरयू मोटार्स आहे. या ठिकाणी पैसाचं वाटप चालु असल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले असता त्यांना काहीच आढळून आलं नाही. याबाबत एबीपी माझाशी बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, रात्री साडेदहा वाजता 10 ते 12 अधिकारी आले होते. त्यांनी सगळे सर्च ऑपरेशन केलं. त्यांना इथं काहीही मिळालं नाही. त्यांना आण्ही सहकार्य केल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. याबाबत मला काहीही माहित नाही. तक्रार कोणी दिली हे आम्ही विचारले पण त्यांनी काहीच माहिती दिली नसल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. जोपर्यंत काही फॅक्ट्स समोर येत नाहीत, त्यामुळं त्याबाबत बोलणंयोग्य होणार नसल्याचे युगेंद्र पवार म्हणाले. होणाऱ्या सगळ्या चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार असल्याचे युग्रेंद्र पवार म्हणाले. 

सत्तेत आहेत, त्यामुळं हे सगळं होणारच : श्रीनिवास पवार

याबाबत युगेंद्र पवार यांचे वडील आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. रात्री शोरुम बंद होते. मात्र, अधिकारी आल्यावर त्यांनी तक्रार आल्याचे सांगितले. त्यानंतर आमच्या स्टाफने अधिकाऱ्यांना शोरुमध्ये नेल्याची माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी शोरुमची सगळी झाडाझडती घेतली. पण त्यांना इथं काही मिळालं नाही. ते सत्तेत आहेत, त्यामुळं हे सगळं होणारच असेही श्रीनिवास पवार यावेळी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Baramati Assembly constituency: बारामतीत पुन्हा पवार विरूध्द पवार! दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला, अजितदादांना पुतण्या युगेंद्र देणार टफ फाईट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीसTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
तब्बल 100 विद्यार्थिनींना शाळेत शर्ट काढायला लावले, फक्त ब्लेझरमध्येच घरी पोहोचल्या; प्रिन्सिपलच्या कृतीनं संतापाचा कळस
Manikrao Kokate : 'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
'तो' विषय संपला! छगन भुजबळांबाबत कृषिमंत्री कोकाटेंची नरमाईची भूमिका; नेमकं काय म्हणाले?
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
वाघोबाचं बस्तान हलणार! धाराशिवमध्ये वाघाच्या रेस्क्यूला 15 दिवसांनी परवानगी, ताडोबाच्या जंगलातलं रेस्क्यू पथक दाखल झालं
IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनीचा SME आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी
Ind vs Eng T20 Squad : हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
हार्दिक पांड्यावर बीसीसीआयचा भरवसा नाय का? संघात घेतलं पण उपकर्णधारपद काढून टाकलं, जाणून घ्या संपूर्ण भारतीय संघ
Torres Scam : ग्राहकांना 14 महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या, एक गाडी शोरुममध्ये ठेवत प्रलोभन दाखवलं, टोरेसचे नवनवे कारनामे समोर  
गुंतवणूकदारांना 14 महागड्या कार गिफ्ट देत प्रलोभन दाखवलं, एक गाडी शोरुममध्ये ठेवली, टोरेसचे कारनामे समोर
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
Embed widget