एक्स्प्लोर

Maharashtra Election: महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भात सी वोटरचा सर्व्हे समोर, मतदारांचा कल कुणाच्या बाजूनं? मविआ की महायुती; कुणाचं टेन्शन वाढणार?

Maharashtra Assembly Election 2024 Survey:महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील सी वोटरचा सर्वे समोर आला आहे. या सर्व्हेमधील आकडेवारीमुळं लोकांचा कल काय असेल याचा अंदाज येतो.  

Maharashtra Election 2024 मुंबई: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. तर, निवडणकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न राजकीय नेत्यांकडून आणि पक्षांकडून केले जात आहेत. या दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातील एक सर्व्हे समोर आला आहे. सी वोटरनं तो सर्व्हे केला आहे. सी वोटरच्या आकडेवारीनुसार 51 टक्के लोकांचा कल असा होता की ज्यामुळं विद्यमान महायुती सरकारमधील राजकीय पक्षांची चिंता वाढू शकते.  

सी वोटरच्या सर्व्हेमध्ये जेव्हा लोकांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही भाजप शिंदे सरकारच्या कामगिरीवर नाराज आहात का आणि सरकार बदलण्याची इच्छा आहे का तेव्हा 51.3 टक्के लोकांनी याचं हो असं उत्तर दिलं. त्यांनी सरकारच्या कामगिरीबाबत राग असून सरकार बदलण्याची इच्छा असल्याचं म्हटलं. 3.7 टक्के लोकांनी राग आहे पण सरकार बदलण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं. तर, 41 टक्के लोकांनी सरकारच्या कामगिरीवर नाराज नसल्याचं म्हटलं. त्यांनी पुन्हा महायुती सरकार यावं, अशी त्यांना अपेक्षा आहे. 4 टक्के लोकांनी या प्रश्नावर काहीच बोलायचं नाही,असं म्हटलं. यातून असं दिसून येतं की सरकार बदललं जावं असं वाटणाऱ्यांची संख्या जवळपास 51 टक्के आहे.   

मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला?

महाराष्ट्रातील लोकांना जेव्हा मुख्यमंत्री पदासाठी पसंती विचारण्यात आली तेव्हा 27.6 टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं असं वाटणाऱ्यांची लोकांची टक्केवारी 22.9 टक्के आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला 10.8 टक्के लोकांनी पसंती दिली. शरद पवार यांच्या नावाला 5.9 टक्के लोकांनी तर अजित पवार यांच्या नावाला 3.1 टक्के लोकांनी पसंती दर्शवली.  

भाजप शिवसेना सरकारची कामगिरी कशी राहिली?

सी वोटरच्या सर्व्हे नुसार 52.5 टक्के लोकांनी कामगिरी चांगली राहिल्याचं म्हटलं. 21. 5 टक्के लोकांनी कामगिरी सरासरी होती, असं म्हटलं. तर, 23.2 टक्के लोकांनी कामगिरी खराब असल्याचं म्हटलं.  

निवडणुकीवर परिणाम करणारे मुद्दे

मराठा आरक्षणाचा मुद्दा 23.0 टक्के लोकांनी प्रभावशाली मुद्दा असल्याचं मान्य केलं. तर, 12.2 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी महत्त्वाचा मुद्दा असल्याचं म्हटलं. झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा 9.8 टक्के लोकांनी महत्त्वाचा मानला. 7 टक्के लोकांनी सरकारची कामगिरी आणि योजनांबद्दल भाष्य केलं. शासकीय रुग्णालयांची स्थिती हा मुद्दा 8.2 टक्के लोकांना निवडणूक प्रभावित करणारा वाटला. 6 टक्के लोकांनी  राज्यांची आर्थिक स्थिती आणि 2.5 टक्के लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट हा मुद्दा प्रभावशाली असल्याचं सांगितलं.  

इतर बातम्या :

Nawab Malik: अजित पवार हे महाराष्ट्राचे चंद्राबाबू नायडू, नवाब मलिकांचं मोठं वक्तव्य; फडणवीसांबद्दलही बोलले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
Ind vs Aus Pink Ball Test : पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
Nashik Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 06 December 2024 सकाळी 10 च्या हेडलाईन्सTop 90 at 9AM Superfast 06 December 2024 ९ सेकंदात बातमीABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 06 December 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सCM N DCM at Chaitya Bhoomi : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमी येथे बाळासाहेबांना अभिवादन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
कोल्हापुरात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन सख्ख्या चिमुकल्यांचा अंत झाल्याने संशय बळावला
Ind vs Aus Pink Ball Test : पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
पहिलाच चेंडू अन् ज्याची भीती तेच घडलं, मिचेल स्टार्क नावाचं वादळ घोंघावलं; जैस्वाल पुन्हा शून्यावर बाद!
Nashik Unseasonal Rain : नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं, शेतकऱ्यांची दाणादाण, जनजीवन विस्कळीत
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून तुम्ही स्वतःला शिट्ट्या वाजवण्यापासून रोखू शकणार नाही
'पुष्पा 2: द रुल'मधला 'हा' क्लासी सीन कमावून देणार 2000 कोटी; VIDEO पाहून क्रेझी झाली ऑडियन्स
Embed widget