एक्स्प्लोर

लेखाजोखा मतदारसंघाचा | नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार?

गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढत आपला प्रभाव निर्माण केला आहे. भाजपच्या या मुसंडीमुळे सध्या तरी काँग्रेस पक्षाला नागपूर पूर्व मतदारसंघात पुन्हा वापसी करण्यासाठी झगडावे लागत आहे.

नागपूर शहरात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी ज्या मतदारसंघात नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानल्या जाणाऱ्या 'स्मार्ट सिटी' योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे तो म्हणजे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ. नागपूर शहरातील ज्या विधानसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य मिळवलं, तो म्हणजे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ. नेहमी पासूनच संमिश्र जातीय, सामाजिक आणि आर्थिक समीकरण असलेल्या या मतदारसंघावर दीर्घकाळ काँग्रेस पक्षाचा वरचष्मा होता. मात्र, गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढत आपला प्रभाव निर्माण केला आहे. भाजपच्या या मुसंडीमुळे सध्या तरी काँग्रेस पक्षाला नागपूर पूर्व मतदारसंघात पुन्हा वापसी करण्यासाठी झगडावे लागत आहे. काय आहे मतदारसंघाचा राजकीय इतिहास ? 1967 पासून 2004 पर्यंत एकूण 9 विधानसभा निवडणुकांमध्ये नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने विजय मिळवला होता. त्यामुळे या मतदारसंघाला एकाप्रकारे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानले जायचे. 1990 पासून 2004 पर्यंतच्या चार विधानसभा निवडणुकात तर या मतदारसंघातून काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी विजयी झाले होते. त्यामुळे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ म्हणजे सतीश चतुर्वेदी यांचा 'गड' असेच समीकरण इथे चालायचे. सतीश चतुर्वेदी यांनी आपला हा 'गड' आणखी मजबूत करण्यासाठी इथे मोठ्या संख्येने 'छत्तीसगडी' आणि 'उत्तर भारतीय' मतदारांना वसवले होते. त्यामुळे या मतदारसंघात नेहमीपासूनच मोठी संख्येत असलेले तेली आणि कुणबी समाज राजकीयदृष्ट्या मागे पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अनुभवी नगरसेवक कृष्णा खोपडेंना उमेदवारी दिली आणि 2009 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच पुर्व नागपुरात भाजपचे कमळ फुलले. तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कृष्णा खोपडे यांनी भुमिपुत्र असलेल्या मतदारांच्या जोरावर अजेय मानल्या जाणाऱ्या दिग्गज सतीश चतुर्वेदी यांचा तब्बल 35 हजार 216 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघात त्यांचा सलग दहावा विजय मिळवण्यापासून वंचित राहावे लागले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही कृष्णा खोपडे यांनी त्यांची आघाडी आणखी मजबूत करत काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांना तब्बल 40 हजार 474 मतांनी धूळ चारत नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ भाजपचा किल्ला मजबूत केला. लेखाजोखा मतदारसंघाचा | नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार? काय आहे जातीय, भाषिक, सामाजिक आणि आर्थिक समीकरण? नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ नेहमीपासूनच संमिश्र समीकरणांसाठी ओळखला जातो. जातीय समीकरणांचा विचार केल्यास इथे 'तेली' समाजाच्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर 'कुणबी' समाजाचे मतदान आहे. 'उत्तर भारतीय' आणि 'छत्तीसगडी' मतदार तिसऱ्या क्रमांकावर असून 'सिंधी-मारवाडी-गुजराती' या उद्योग - व्यापार करणाऱ्या जातींचा ही संख्यात्मक प्रभाव या मतदारसंघात आहे. मराठी सह हिंदी, छत्तीसगडी, गुजराती, मारवाडी व सिंधी भाषा बोलणारा वर्ग या मतदारसंघात सहज दिसून येतो. शिवाय इथले सामाजिक आणि आर्थिक समीकरण ही संमिश्र स्वरूपाचे आहे. या मतदारसंघात डिप्टी सिग्नल, भांडेवाडी, भरतवाडा, कळमना झोपडपट्ट्या आहेत. तर याच मतदारसंघात लकडगंज, सूर्यनगर आणि वर्धमान नगर सारख्या धनाढ्य वस्त्या ही आहेत. त्यामुळे गरीब व अल्प मध्यमवर्गीय मतदारांसह उद्योग व्यापार करणारा धनिक वर्ग ही या मतदारसंघात आहे. कळमनामध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असल्याने या मतदारसंघात मजूर वर्ग ही मोठ्या संख्येने आहे. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या खास अशा संमिश्र संरचनेमुळे इथे सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या ही मोठी आहे. त्याचे कारण म्हणजे प्रत्येक इच्छुकाला आपापल्या जातीय, सामाजिक, आर्थिक गटाशी मिळतेजुळते मतदारांचे ठराविक पॉकेट्स दिसत असल्याने इथे कार्यकर्त्यांपेक्षा विधानसभेत दाखल होऊ पाहणाऱ्या नेत्यांची संख्याच जास्त दिसून येत आहे. भाजपमध्ये स्वाभाविकरीत्या गेले दोन वेळा मोठा विजय मिळवणाऱ्या कृष्णा खोपडे यांचे नाव आघाडीवर आहे. ते नितीन गडकरी यांचे खास विश्वासू मानले जात असल्याने आणि गडकरींना लोकसभेत सर्वाधिक मताधिक्य मिळवून दिल्यामुळे कृष्णा खोपडे यांचे भाजपच्या उमेदवारीसाठी पारडे जड आहे. मात्र, या भागातून अनेक वेळा नगरसेवक पद भूषविणारे अनेक भाजप कार्यकर्ते यंदा पक्षात परिवर्तनाची उमेद लावून आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर,भाजपच्या महिला नगरसेविका चेतना टांक, महापालिकेच्या परिवहन समितीचे विद्यमान अध्यक्ष बंटी कुकडे यांची महत्वाकांक्षा ही कोणापासून लपलेली नाही. लेखाजोखा मतदारसंघाचा | नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार? तिकडे काँग्रेस पक्षामध्ये इच्छुकांची यादी लांबलचक आहे. गेल्या वेळेला 40 हजार मतांनी पराभव स्वीकारल्यानंतर ही अभिजित वंजारी हे गेले 5 वर्ष मतदारसंघात विविध आंदोलने आणि पक्षीय कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वतःचे नाव चर्चेत ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. यावेळेला पक्षाने उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात टाकावी अशी त्यांची दाट इच्छा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस मधून काँग्रेस पक्षात आलेले आणि प्रदेश प्रवक्ता हे महत्वाचे पद मिळवणारे अतुल लोंढे यांनीही उमेदवारीसाठी इच्छा दर्शविली आहे. उत्तर भारतीय सेनेच्या माध्यमातून सामाजिक जीवनात कार्य करणाऱ्या उमाकांत अग्निहोत्री, माजी महापौर नरेश गावंडे यांनी ही उमेदवारीसाठी स्वतःचा दावा पुढे केला आहे. तर पारडी परिसरातून विद्यमान नगरसेवक पुरुषोत्तम हजारे त्यांच्या जनाधाराच्या आधारावर काँग्रेस उमेदवार म्हणून स्वतःचा दावा पुढे करत आहेत. नागपूर पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे ही अस्तित्व आहे. युती आणि आघाडीत जर काही कारणांनी बिघाडी झाली तर या पक्षातील अनेक कार्यकर्ते उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक दूनेश्वर पेठे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर भाजपसोबत युतीची शक्यता मावळल्यास शिवसेनेकडून विद्यमान नागपूर शहर अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. तर काही आठवड्यापूर्वी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून घेणारे आणि काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यन्त चतुर्वेदी हे शिवसेनेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्याशिवाय यशवंत रहांगडाले, रविनिश पांडे हे युवा कार्यकर्ते ही पक्षाकडे उमेदवारी मागू शकतात. नागपूर पुर्व मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कडून कोण उमेदवार असेल याचे चित्र सध्या स्पष्ट नसले तरी वंचित बहुजन आघाडी कडून वेळेवर मतदारसंघाच्या जातीय समीकरणांना लक्षात घेत उमेदवार देण्याची शक्यता असल्याने त्यांचा उमेदवार इतरांचे खेळ बिघडवू शकतो हे नाकारता येणार नाही. गेल्या काही निवडणुकांचे मतदान काय सांगतात? 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकात भाजप उमेदवार असलेल्या कृष्णा खोपडे यांचा अनुक्रमे 35 हजार आणि 40 हजारांचा मताधिक्य लक्षात घेतल्यास नागपूर पूर्व विधानसभा क्षेत्रात भाजपचा वरचश्मा स्पष्ट जाणवतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि नितीन गडकरी यांना तब्बल 75 हजार 380 मतांचा सर्वाधिक मताधिक्य ही याच मतदारसंघातून मिळाल्यामुळे इथे भाजपच्या संगठनेची ताकत लक्षात येते. लोकसभा निवडणूक 2019 (नागपूर पूर्व मतदारसंघात पक्ष निहाय मतदान) नितीन गडकरी (भाजप) - 1 लाख 35 हजार 451 मत नाना पटोले (काँग्रेस) - 60 हजार 71 मत मतदारसंघात महत्वाचे मुद्दे काय? केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी 'स्मार्ट सिटी' योजनेसाठी नागपूर पूर्व मतदारसंघातील पारडी-पुनापूर क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे नियोजित असून त्यासाठी लोकांच्या घरांचे, दुकानाचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. साहजिकच काही लोकांमध्ये या सरकारी अधिग्रहणाच्या प्रक्रियेबद्दल असमाधान आहे. शिवसेनेने या मुद्द्याला हाताशी धरत मतदारसंघात आपला जम बसवण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यांच्या काही युवा नेत्यांकडून हेतुपुरस्सर नागपुरातील भाजपच्या नेतृत्वाबद्दल वातावरण तापवले जात आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा मुद्दा जसा इन्फ्रास्ट्रक्चरचं काम म्हणून भाजपच्या भात्यातला एक हत्यार आहे तसाच तो मित्र पक्षाच्या खेळीमुळे काही अंशी डोकेदुखी ही आहे. नागपूर पूर्व मतदारसंघात मोठ्या विकास कामांचे अनेक प्रकल्प सध्या सुरु आहेत. नागपूर भंडारा रोडवरील पारडी उड्डाणपूल आणि कळमना उड्डाणपुलाचे काम गेले अनेक महिने कासव गतीने सुरू असल्याने हे प्रकल्प प्रलंबित राहिले आहे, त्यामुळे या भागात नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, सातत्याने होणारे अपघात आणि निर्माण कार्यामुळे परिसरात उडणारी धूळ अशा प्रश्नामुळे या परिसरात अनेक आंदोलने झाले आहेत. या विकासकामांचा श्रेय घेणाऱ्या भाजपला या कामांच्या दिरंगाई बद्दल निवडणुकीत उत्तर देणे काहीसे कठीण जाऊ शकते. शिवाय डिप्टी सिग्नल, भांडेवाडी, भरतवाडा, कळमना, पारडी परिसरातील झोपडपट्ट्यांचे विविध प्रश्न, आऊटर रिंग रोडवरील वस्त्यांमध्ये पाण्याच्या पाईपलाईनचे प्रलंबित प्रश्न, भांडेवाडी डंपिंग यार्डमुळे त्या परिसरातील अस्वच्छता, रोगराई आणि वारंवार आग लागण्याच्या समस्या, शांती नगर व लकडगंज दरम्यान अंडरपास बनवण्याची पूर्ण न झालेली घोषणा, लकडगंज परिसर निवासी जाहीर झाल्यांनतर ही त्या भागातील उद्योगांच्या स्थलांतरणाचा न सुटलेला प्रश्न असे अनेक प्रलंबित आणि अपूर्ण राहिलेले मुद्दे विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी आव्हानात्मक ठरू शकतात. मात्र, नागपूर पूर्व या मतदारसंघात भाजपचे सशक्त संगठन, कार्यकर्त्यांची फौज आणि नगरसेवकांची मालिका याच्या जोरावर भाजप या सर्व प्रलंबित प्रश्नांवर जनतेची समजूत काढण्याच्या प्रयत्नात आहे. कृष्णा खोपडे यांनी 2009 मध्ये यशस्वीरित्या रोखले. या वेळेला ही तेच भाजपकडून उमेदवार राहण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन विधानसभा निवडणुकात अनुक्रमे 35 आणि 40 हजारांचा तर 2019 च्या लोकसभेत तब्बल 75 हजारांचा मताधिक्य मिळवणाऱ्या भाजप ने यावेळेला नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात 1 लाखांच्या मताधिक्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे गटातटात विभागलेली काँग्रेस कृष्णा खोपडे आणि भाजपला या मतदारसंघात कितपत आव्हान देऊ शकते, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
Embed widget