एक्स्प्लोर

चिमूर विधानसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार?

कुठल्या एका जातीचे या मतदारसंघात वर्चस्व नसल्यामुळे पक्ष आणि उमेदवार यांच्या वैयक्तिक छबीच्या आधारावर आजपर्यंत इथे मतदान झाले आहे. त्यामुळेच जात हा एकमेव निकष लावून कोणत्याच आमदाराला आजपर्यंत या मतदार संघातून निवडून येता आलेले नाही.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या अतुलनीय कामगिरीमुळे ज्या गावाने आपलं नाव नेहमीसाठी अजरामर केलं ते गाव म्हणजे चिमूर आणि याच गावाच्या नावावर आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदारसंघ. सध्या हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. मात्र असं असलं तरी काँग्रेसला देखील इथे जिंकण्याची तेवढीच संधी आहे. 1995 पर्यंत काँग्रेसशिवाय इतर कुठल्याही पक्षाला थारा न देणाऱ्या या मतदारसंघाने गेल्या पंचवीस वर्षात अनेक बदल करून दाखवले आहेत. शिवसेना, काँग्रेस, भाजप, बंडखोर अशा सगळ्यांनाच या मतदारसंघाने संधी दिली आहे.
हा मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यात येत असला तरी गडचिरोली लोकसभा क्षेत्रात याचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अशोक नेते यांना बारा हजार मतांची आघाडी मिळाली आहे. ही बाब भाजपचे आमदार बंटी उर्फ किर्तिकुमार भांगडिया यांच्या पथ्यावर पडणारी आहे. चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनाच यावेळी भाजपची उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला चिमूर विधानसभा क्षेत्रात बारा हजारांची आघाडी मिळाली होती. भाजपचा पारंपरिक मतदार असलेला माना समाज या वेळी अशोक नेते यांच्या विरोधात असताना देखील भाजप उमेदवाराला ही आघाडी मिळवून देण्यात बंटी भांगडिया यांची भूमिका महत्त्वाची होती. मात्र असं असलं तरी त्यांच्या समोरची आव्हानेही फार मोठी आहेत. दोन वर्ष आधी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत चिमूर मतदारसंघात भाजपला आणि पर्यायाने बंटी भांगडिया यांना मोठं अपयश मिळालं होतं. पूर्ण मतदारसंघात भाजपचा एकच सदस्य निवडून आला. त्यामुळे काँग्रेस चिमूर विधानसभा क्षेत्रात अजूनही आपली ताकत राखून असल्याचा संदेश गेला. सोबतच भाजप मधल्या जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी देखील भांगडिया यांना भोवण्याची शक्यता आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीआधी भांगडिया हे भाजपमध्ये आले आणि त्यांनी उमेदवारी मिळवली. आमदार झाल्यावर त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यापेक्षा आपल्याच मर्जीतील कार्यकर्त्यांना मोठं केलं असा त्यांच्यावर आरोप आहे.  भाजपचे अनेक कार्यकर्ते आता या भागात भारतीय जनता पार्टी उरली नसून भांगडिया जनता पार्टी झाली आहे अशी खंत व्यक्त करतात. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची ही नाराजी निवडणुकीत मोठी डोकेदुखी ठरू शकते. भाजपचे या भागातले जुने कार्यकर्ते आणि माजी तालुकाध्यक्ष धनराज मुंगले यांनी मतदारसंघात प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. नितीन गडकरी यांच्या अतिशय मर्जीतील कार्यकर्ते अशी मुंगले यांची ओळख आहे. मुंगले यांनी आमदार भांगडिया यांना उघडपणे विरोध केला असून आपण कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढविणार असा त्यांनी चंग बांधलाय. मुंगले यांना भाजपचे जुने आणि भांगडिया यांच्यापासून दुखावलेले कार्यकर्ते मदत करतील अशी चर्चा आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील ज्या काही प्रमुख मतदारसंघांमध्ये वंचित फॅक्टर काम करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामध्ये चिमूर मतदार संघाचाही समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार रमेश कुमार गजबे यांना चिमूर मतदारसंघात तब्बल 51 हजार मते मिळाली होती. चिमूर मतदारसंघात माना समाजाचे मोठे प्राबल्य आहे आणि हा समाज लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील वंचित आघाडी सोबत जाऊ शकतो. माना समाज हा गेल्या काही वर्षांपासून भाजपचा मतदार राहिला आहे आणि असं झालं तर भाजपला याचा फटका बसू शकतो.
काँग्रेस पक्षाकडून या वेळी डॉ. सतीश वारजुरकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे माझी अध्यक्ष आणि वर्तमान जिल्हा परिषद सदस्य असलेले डॉ.सतीश वारजुरकर हा काँग्रेस मधला लो प्रोफाइल आणि जमिनीवर काम करणारा चेहरा आहे. मागच्या निवडणुकीत काँग्रेसने सतीश वारजुरकर यांचे बंधू आणि माजी आमदार अविनाश वारजूरकर यांना उमेदवारी दिली होती मात्र निवडणुकीत त्यांचा 25 हजार मतांनी पराभव झाला. त्यानंतर सतीश वारजुरकर यांनी अतिशय पद्धतशीरपणे पाच वर्ष मतदारसंघात संपर्क आणि प्रचार सुरू ठेवला. संपूर्ण मतदारसंघात त्यांच्याइतका संपर्क असलेला दुसरा नेता नसल्यामुळे त्यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र असं असलं तरी काँग्रेस पक्षातून त्यांच्या नावाला विरोध देखील आहे. काँग्रेस पक्षाच्या दोन वर्तमान जिल्हा परिषद सदस्यांचा त्यांच्या नावाला तीव्र विरोध आहे आणि ही बाब निवडणुकीत काँग्रेस पक्षासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.
आमदार बंटी भांगडिया यांचा चिमूर मतदारसंघात जनसंपर्क अतिशय दांडगा आहे. मतदारसंघात सुरु असलेले राष्ट्रीय महामार्गांचे काम, नगरपरिषद आणि बसस्थानक यांच्या नवीन इमारतीसाठी निधी खेचून आणण्यात त्यांना यश आलं आहे. मतदारसंघातील चिमूर आणि नागभिड नगरपरिषद या भाजपच्या ताब्यात असल्यामुळे बंटी भांगडिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करत त्यांना मोठा विकास निधी मिळवून दिला. मतदार संघातील लोकांना सहज उपलब्ध असलेला आमदार अशी त्यांची प्रतिमा आहे.
कुठल्या एका जातीचे या मतदारसंघात वर्चस्व नसल्यामुळे पक्ष आणि उमेदवार यांच्या वैयक्तिक छबीच्या आधारावर आजपर्यंत इथे मतदान झाले आहे. त्यामुळेच जात हा एकमेव निकष लावून कोणत्याच आमदाराला आजपर्यंत या मतदार संघातून निवडून येता आलेले नाही. 2014 मध्ये मोदी लाट असतांना बंटी भांगडिया 25 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. राज्यामध्ये सध्या भाजपला मोठी अनुकूल स्थिती आहे आणि हेच ओळखून अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजप मध्ये उड्या मारत आहे. मात्र चिमूर मतदारसंघात काँग्रेसला पक्ष बदल किंवा बंडखोरीचा अजून फटका बसलेला नाही. त्यामुळेच भाजप, काँग्रेस आणि वंचित-बहुजन आघाडी यांना इथे जिंकण्याची समसमान संधी आहे.
2014 च्या विधानसभेला कोणाला किती मतं?
कीर्तीकुमार भांगडिया (भाजप) : 87 हजार 377
डॉ. अविनाश वारजुरकर (कॉंग्रेस) : 62 हजार 222
गजानन बुटके (शिवसेना) : 12 हजार 105
नरेंद्र दडमल (बसपा) : 9 हजार 841
2019 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून कोणाला किती मतं?
अशोक नेते (भाजप) : 77 हजार 730 
डॉ.नामदेव उसेंडी (काँग्रेस) : 65 हजार 714 
डॉ.रमेश कुमार गजबे (वंचित बहुजन आघाडी) : 50 हजार 61
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळल्याचा आरोप Tirupati Temple : ABP MajhaZero Hour : युतीत आमच्या पक्षाला संधी दिली जात नाही, Ramdas Athawale यांनी व्यक्त केली नाराजीZero Hour : मविआत मुख्यमंत्रीपदावरुन शर्यत तर महायुतीत जागांवरुन संघर्ष  ABP MajhaZero Hour Guest Centre : कुणाला जास्त फायदा झाला यावर चर्चा करण्यात अर्थ नाही- विश्वजीत कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Embed widget