एक्स्प्लोर

पालघर लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात, पण 'नोटा' तिसऱ्या क्रमांकावर

पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संस्थेच्या नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे भारतीय मतदारांना 'नन ऑफ द अबॉव्ह' म्हणजे 'नोटा' हा नकाराधिकार वापरण्याचा हक्क मिळाला.

वसई : राज्यात काही ठिकाणी वंचित फॅक्टरमुळे काँग्रेसला फटका बसल्याचं चित्र असताना, पालघर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी नोटा पर्यायाला मोठी पसंती दिल्याचं समोर आलं आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित, बहुजन विकास आघाडी बळीराम जाधव यांच्यापाठोपाठ नोटा पर्याय तिसऱ्या क्रमांकावर राहिला. नोटा तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे विजयी उमेदवार राजेंद्र गावित यांना 5,80,479  मतं मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावरील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 4,91,596 मतं मिळाली. त्याचवेळी 'नोटा'ला 29,479 मतं मिळाली. या निवडणुकीत बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी तसंच अपक्ष धरुन 13 उमेदवार रिंगणात होते. तरीही मतदारांनी 'नोटा'ला अधिक पसंती दिली. यंदा मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी झाली होती. त्यामुळे स्वतंत्र विचारसरणीचे अनेक मतदार यावेळी जोडले गेले होते. राजेंद्र गावित हे 88,883 मतांनी निवडून आले आहेत. मात्र नोटाला मतदारांनी एवढी पसंती दिल्याने राजकीय तर्क-विर्तक सध्या लढवले जात आहेत. 'नोटा'चा पर्याय का? खरंतर पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संस्थेच्या नऊ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे भारतीय मतदारांना 'नन ऑफ द अबॉव्ह' म्हणजे 'नोटा' हा नकाराधिकार वापरण्याचा हक्क  मिळाला. मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी टाळाटाळ होऊ नये, लोकशाहीतल्या 'निवडणूक' या विषयावर नाराज असलेल्या लोकांनीही मतदानाचा अधिकार बजवावा, असा त्यामागचा उद्देश होता. मात्र पालघर लोकसभा मतदारसंघात नोटा तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने निवडणुकीविषयी मतदारांच्या मानसिकतेचाही विचार होत आहे. पालघर मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मतं 1. राजेंद्र गावित (शिवसेना) : 5,80,479 2. बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी) : 4,91,596 3. नोटा : 29, 479 4. संजय तांबडा (बहुजन समाज पार्टी) : 13446 5. कॉम्रेड शंकर बदादे (मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) - 11918 6. सुरेश पाडवी (वंचित बहुजन आघाडी) : 13,728 7. संजय कोहकेरा (बहुजन मुक्ती पार्टी) : 6185 8. दत्ताराम करबट (अपक्ष) : 13932 9. भोंडवे ताई मारुती (अपक्ष) :5304 10. राजू लडे (अपक्ष) : 10218 11. विष्णू  पाडवी (अपक्ष) : 9904 12. स्वप्नील कोळी (अपक्ष) :7539 13. देवराम कुरकूटे (आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया) :8213 एकूण वैध मतं - 11,72,462 अवैध मतं - 256 पोस्टल मतं - 1011 (वैध मतं - 739, अवैध मतं - 256) एकूण मतदान - 12,02,197
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Embed widget