राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर-माढा-धारशीवमध्ये नेमकं काय घडतंय? कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या माढा (Madha), सोलापूर (Solapur) आणि धाराशीव (Daharashiv) लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडतयं? तर या तिन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहे.
Loksabha Election Result 2024 News : लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election) कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी महायुतीचे उमेदवारही आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या माढा (Madha), सोलापूर (Solapur) आणि धाराशीव (Daharashiv) लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडतयं? तर या तिन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहे. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर धाराशीवमध्ये ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आघाडीवर आहेत.
कोणत्या उमेदवाराला किती माताधिक्य?
माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे 8500 मतांनी आघाडीवर आहेत. तर चौथी फेरी अखेर ओमराजे निंबाळकर हे 53 हजार 917 मतांनी आघाडीवर आहेत. तर सोलापूरमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या 21000 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळं ही आघाडी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते आणि अर्चना पाटील यांची डोकेदुखी वाढवणारी आहे. कारण हे तिन्ही उमेदवार सध्या पिछाडीवर आहेत. मात्र, हे सुरुवातीचे कल आहेत. अद्याप पूर्ण मतमोजणी झालेली नाही. त्यामुळं पुढच्या फेऱ्यांमध्ये नेमकं काय होणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या: