एक्स्प्लोर

बीड ते सातारा! मतदारांनी 'तुतारी'सोबत पिपाणी'ही वाजवली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अनेक जागांवर फटका!

Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या उमेदवारांना हजारोंच्या संख्येने मतं मिळाली आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) घटकपक्षांनी जोरदार कामगिरी केली. या निवडणुकीत काँग्रेस (Congress) महाराष्ट्रात सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या आहेत. दरम्यान, शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पिपाणी या निवडणूक चिन्हामुळे अनेक जागांवर मतफुटीचा फटका बसला आहे. साताऱ्यातील (Satara) जागेवरही याच मतफुटीमुळे पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसल्याचं बोललं जातंय. 

'तुतारी वाजवणारा माणूस' ऐवजी 'पिपाणी'ला मतं

'तुतारी वाजवणार माणूस' हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाने काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे निवडणूक चिन्ह दिले होते. त्यामुळे मतदारांचा गोंधळ झाला आणि 'तुतारी वाजवणारा माणूस' ऐवजी 'पिपाणी'ला अनेक ठिकाणी मतदान अधिक झाल्याचा राष्ट्रवादीने दावा केला आहे.सातारा, दिंडोरी, रावेर, भिवंडी, शिरूर अशा जागांवर पिपाणी या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला लक्षणीय मतं पडली आहेत.  

पिपाणी चिन्ह असणाऱ्यांना किती मतं?

पिपाणी या चिन्हामुळे आम्हाला मिळणारी मतं फुटली आहेत, असं पवार यांच्या राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. रावेर, दिंडोरी, भिवंडी, बारामती, शिरुर, अहमदनगर, बीड, सातारा या जागांवर पिपाणी या चिन्हांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना कित्येक मतं पडली आहेत. आकड्यांत सांगायचे झाल्यास रावेर या जागेवर पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे एकनाथ साळुंके यांना 43 हजार 957 मतं पडली आहेत. त्याच प्रमाणे दिंडोरी या जागेवरून बाबू भगरे (सर) यांना 1 लाख 3 हजार 632 मते पडली आहेत. भिवंडी जागेवर कांचन वखरे यांना 24 हजार 625 मते मिळाली. बारामती या जागेवर शेख सोएलशहा यांना 14 हजार 917 मते पडली आहेत. शिरुरमध्ये मनोहर वाडेकर यांना 28 हजार 324, अहमदनगरमध्ये गोरख आळेकर यांना 44 हजार 597,  बीडमध्ये अशोक थोरात यांना 54 हजार 850 मते, साताऱ्यात संजय गाडे यांना 37 हजार 62 मते पडली आहेत. 

 ...तर साताऱ्यात पवारांच्या उमेदवाराच विजय झाला असता

साताऱ्यात भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली. उदयनराजे यांना एकूण 5 लाख 71 हजार 134 मतं पडली. त्यानंतर पवार यांच्या पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना 5 लाख  38 हजार 363 मतं पडली. म्हणजेच शिंदे यांचा 32 हजार 771 मतं कमी पडली. दुसरीकडे याच मतदारसंघात पिपाणी हे निवडणूक चिन्ह असणाऱ्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली.

हेही वाचा :

तुतारी, पिपाणीचा घोळ! साताऱ्यात संजय गाडेंच्या चिन्हामुळे शिंदेंचा पराभव? वाचा नेमकं काय घडलं?

"एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान", फडणवीसांच्या घोषणेनंतर मोहित कंबोज यांचं ट्वीट!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Embed widget