एक्स्प्लोर

"एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान", फडणवीसांच्या घोषणेनंतर मोहित कंबोज यांचं ट्वीट!

लोकसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर आता मोहित कंबोज यांच्या ट्वीटची चर्चा होत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024 Result) भाजप आणि महायुतीला (Mahayuti) फटका बसला आहे. भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्यात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. याची मी जबाबदारी घेतो. मला जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती मी केंद्रातील नेत्यांना करणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. असे असतानाच भाजपचे मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. एकीकडे फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली असताना कंबोज यांच्या ट्वीटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. 

मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले?

मोहित कंबोज यांनी एक ट्वीट केलं आहे. फक्त एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान केलं आहे. राज्यातले मंत्री आणि ज्येष्ठ नेतेही पराभवासाठी जबाबदार आहेत. महाराष्ट्र भाजप आणि मुंबई भाजपनं आत्मपरिक्षण करायला हवं, असं मोहित कंबोज आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. 

कंबोज यांचा रोख कुणाकडे?

कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही. मात्र त्यांनी राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपच्या आणखी काही नेत्यांना लोकसभा निवडणुकीतील कामगिरीला जबाबदार धरलं आहे. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे, असे विचारले जात आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

या लोकसभा निडणुकीत महायुतीच्या जागा घटल्या. भाजपच्याही जागा कमी झाल्या आहेत. या खराब कामगिरीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. भाजपच्या या खराब कामगिरीची मी जबाबदारी स्वीकारतो. मला मंत्रिमंडळातून मुक्त करावं, अशी विनंती मी केंद्रातील शीर्षस्थ नेत्यांना करणार आहे, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करण्यासाठी हा निर्णय घेण्याची मी तयारी केली आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

दरम्यान, फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भूमिका मांडली. मी केंद्राशी चर्चा करणार आहे. "त्यानंतरच मी निर्णय घेणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण त्यांना सरकारच्या बाहेर जाऊन काम करण्याची गरज नाही. सरकारमध्ये राहूनच ते संघटनेत काम करू शकतात. पुढच्या काळात फडणवीस यांच्यासोबत आम्ही राज्याला, पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न करू. मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची गरज नाही, तशी विनंती आम्ही फडणवीस यांना केली आहे. आम्हाला आशा आहे की ते आमची विनंती मान्य करतील," असे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा :

मोठी बातमी : मला उपमुख्यमंत्रिपदावरुन मुक्त करा, देवेंद्र फडणवीसांची भाजप नेतृत्त्वाला विनंती

Devendra Fadnavis: खचलेल्या कार्यकर्त्यांना धीर दिला, प्रदेशाध्यक्षांची पाठराखण केली अन् उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची भाषा; देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेने खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी  मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापलेSupriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्यChandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
भाजप राज्यात भाकरी फिरवणार, दोन महिन्यात खुर्ची बदलणार; संघटन पर्व संपताच महाराष्ट्रात नवा चेहरा
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
शरद पवारांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता, सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंना टोला
Beed Guardian Minister: बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
बीडचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवार मुंबईत येताच निर्णय होणार
Chhagan Bhujbal & Devendra Fadnavis : भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
Embed widget