एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी किरीट सोमय्यांचे प्रयत्न, मात्र 'मातोश्री'वरुन भेट नाकारली
किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर अनेकदा अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. शिवसैनिक सोमय्या यांनी केलेली टीका विसरलेले नाहीत.
मुंबई : पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारांचे अर्ज भरुन झाले, तरी शिवसेना-भाजपच्या ईशान्य मुंबईतील उमेदवारीचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही. त्यातच आता किरीट सोमय्या यांना 'मातोश्री'वरुन भेट नाकारली आहे.
किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेत सोमय्यांविषयी नाराजी आहे. त्यामुळेच किरीट सोमय्या यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किरीट सोमय्यांऐवजी भाजपचे नेते मनोज कोटकांचा विचार करावा, असा सूचक सल्ला मुंबई महापालिकेतील शिवसेना नेत्यांनी दिला आहे.
"किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर अनेकदा अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. शिवसैनिक सोमय्या यांनी केलेली टीका विसरलेले नाहीत. त्यामुळे ईशान्य मुंबई मतदारसंघात किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे," असं शिवसेना खासदार राहुल शेवाळे म्हणाले होते.
त्यामुळे किरीट सोमय्यांकडून उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्याकडून शिवसेनेचे खासदार संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर आणि नेते अनिल देसाईंच्या मनधरणीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरु आहे. मात्र, या प्रयत्नांना अजूनही फळ मिळताना दिसत नाही.
किरीट सोमय्यांनी आधी संजय राऊत यांच्या घरी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण राऊतांनी भेटीसाठी नकार दिला. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी किरीट सोमय्यांनी वेळ मागितली होती. परंतु 'मातोश्री'वरुनही भेटीसाठी नकार मिळाला.
दुसरीकडे किरीट सोमय्यांना जर ईशान्य मुंबईतून युतीचं तिकीट दिलं तर त्यांच्याविरोधात लढण्याचं आव्हान शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी दिलं आहे.
त्यामुळे ईशान्य मुंबईत आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना युतीकडून कोण टक्कर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
VIDEO | सोमय्यांना भेट नाकारली
संबंधित बातम्या
सोमय्यांच्या डोक्यावरील टांगती तलवार कायम, फडणवीस-उद्धव ठाकरेंच्या बैठकीतही तोडगा नाही
किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध कायम, प्रविण छेडा उद्धव ठाकरेंच्या भेटीला
किरीट सोमय्यांनी केलेली टीका शिवसैनिक विसरलेले नाहीत : राहुल शेवाळे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement