एक्स्प्लोर
A-SAT म्हणजे काहींना थिएटरचा सेट वाटला, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींना टोला
अंतराळमधील भारताच्या यशस्वी कामगिरीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर डीआरडीओचं अभिनंदन केलं. सोबतच मोदींना जागतिक रंगभूमीदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
मेरठ (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उत्तर प्रदेशातील मेरठमधून केला. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेससह सर्व विरोधकांवर थेट निशाणा साधला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्वीटवरुन मोदींनी त्यांना उत्तरही दिलं. काही बुद्धिवंताना A-SAT म्हणजे काही जणांना थिएटरचा सेट वाटला, असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला, असा टोला त्यांनी लगावला. तसंच मी चौकीदार आहे आणि चौकीदार कधीही अन्याय करत नाही, असंही मोदी म्हणाले.
हिशेब देणार आणि मागणारही
मेरठमधील सभेत विरोधकांवर हल्लाबोल करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'हिसाब तो होगा..सबका होगा लेकिन बारी-बारी से होगा.' ते माझ्याकडून हिशेब मागतात. मी तर माझ्या पाच वर्षांचा हिशेब देणारच पण त्यांचा हिशेबही घेणार आहे. मी हिशेब देताना त्यांना विचारणार की, आतापर्यंत तुम्ही काय केलं? अखेर तुम्ही आपल्या देशातील लोकांचा विश्वास का मोडला?
सर्जिकल स्ट्राईकचं धाडस चौकीदाराच्या सरकारने केलं!
पंतप्रधानांनी स्वत:ला चौकीदार म्हणत एअर स्ट्राईकच्या विषयावरुन काँग्रेसवर टीका केली. मोदी म्हणाले की, 'जमीन असो, आकाश असो किंवा अंतराळ, सर्जिकल स्ट्राईकचं धाडस तुमच्या याच चौकीदाराच्या सरकारने केलं आहे. वारंवार पुरावे मागणाऱ्या विरोधकांवर हल्ला करताना मोंदीनी देशाला पुरावे हवे आहेत की सुपुत्र असा प्रश्न विचारला.
राहुल गांधींच्या ट्वीटवर पंतप्रधानांचा निशाणा
मेरठमध्ये मिशन शक्तीबाबात राहुल गांधी यांच्या ट्वीटच्या बहाण्याने पंतप्रधानांनी त्यांच्यावर निशाणा साधला. मोदी म्हणाले की, एखादी व्यक्ती थिएटरमध्ये नाटक पाहायला जाते तेव्हा तिथे काय पाहायला मिळतं? तिथे 'सेट' शब्द अतिशय कॉमन सामन्य असतो. या शब्दाचा वारंवार वापर होतो. काही बुद्धीमान लोक असे आहेत, जेव्हा मी 'A-SAT'बद्दल बोलत होतो, तेव्हा ते गोंधळले. त्यांना वाटलं की, मी थिएटरच्या सेटबद्दल बोलतोय. आता अशा बुद्धिमान लोकांवर हसायचं की रडायचं, ज्यांना थिएटरचा सेट आणि अंतराळात अँटी सॅटेलाईट A-SAT ची समज नाही.
अंतराळमधील भारताच्या यशस्वी कामगिरीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर डीआरडीओचं अभिनंदन केलं. सोबतच मोदींना जागतिक रंगभूमीदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
खातं उघडलं नाही, ते खात्यात पैसे काय टाकणार? पंतप्रधानांनी काँग्रेसच्या न्याय योजनेवरही टीका केली. ज्या पक्षाने 70 वर्षात गरिबांसाठी खातं उघडलं नाही, त्यांचं सरकार गरिबांच्या खात्यात काय पैसे टाकणार? गरिबांसाठी कोणत्या सरकारने काम केलं असेल तर ते आमच्या सरकारनेच. वीज, कर्जमाफी आरोग्य क्षेत्र असो किंवा सुरक्षा, प्रत्येक ठिकाणी आम्ही तुम्हाला तुमचा अधिकार दिला आहे. संबंधित बातम्या राहुल गांधींकडून 'डीआरडीओ'चं अभिनंदन, तर मोदींना 'वर्ल्ड थिएटर डे'च्या शुभेच्छा अंतराळात भारताचा सर्जिकल स्ट्राईक, 3 मिनिटात सॅटेलाईटचा वेध : पंतप्रधान मोदी Mission Shakti यूपीएच्या काळातलं, फक्त त्याची चाचणी केली नव्हती : पृथ्वीराज चव्हाण 'Mission Shakti' हे वैज्ञानिकांचं कर्तृत्व, त्यांना प्रसिद्धी मिळू द्या, राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोलाWell done DRDO, extremely proud of your work. I would also like to wish the PM a very happy World Theatre Day.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 27, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement