एक्स्प्लोर

नरेंद्र मोदी स्वबळावर पहिल्यापेक्षा जास्त जागा जिंकणारे पहिले पंतप्रधान

फिर एक बार मोदी सरकार म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपने दिल्लीतील सत्ता कायम राखलीय. पहिल्या टर्मपेक्षा दुसऱ्या टर्ममध्ये जास्त जागा जिंकणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी 1967 आणि 1971 या सलगच्या दोन निवडणुकात पहिल्या टर्मपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या, पण पहिल्यावेळी म्हणजे 1967 ला त्यांचा पक्ष राष्ट्रीय काँग्रेस होता तर 71 ला त्यांचा पक्ष इंदिरा काँग्रेस होता. प्रस्थापितांच्या सिंडिकेट काँग्रेस विरोधात त्यांनी स्वतःचा नवा गट उभा केला होता. त्यानंतर 1980 आणि 84 या सलगच्या दोन निवडणुकात काँग्रेसला पहिल्यापेक्षा जास्त मते मिळाली खरी पण 1980 ला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि 1984 ला राजीव गांधी पंतप्रधान झाले, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर मिळालेल्या सहानुभूतीमुळे त्यांना अभूतपूर्व यश मिळालं होतं. मात्र नरेंद्र मोदी याचं यश हे निश्चितच वरील दोन्ही प्रकारातलं नाही

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे सर्व जागांवरील कल हाती आले आहेत. या निकालात भाजपसह मित्र पक्षांनी मोठी मुसंडी मारली आहे. मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळतील असं एकूण चित्र आहे. भाजप जवळपास 350 जागांवर आघाडीवर आहे. भाजप आणि मित्रपक्षांची ही आघाडी शेवटपर्यंत टिकली तर सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा अधिक जागा मिळवणारा भाजप पक्ष आणि नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.

2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने 282 जागांवर विजय मिळवला होता. तर यंदा भाजप 299 जागांवर आघाडीवर आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपसह मित्रपक्षांनी 336 जागांवर विजय मिळवला होता. तर यंदा भाजपसह मित्रपक्ष 344 जागावर आघाडीवर आहेत.

विरोधकांचा आक्रमक पवित्रा फेल

निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि विरोधीपक्षांनी भाजप विरोधात मोठी मोहीम उघडली होती. यामध्ये नोटाबंदी, राफेल घोटाळा, शेतकऱ्यांचे प्रश्न, जीएसटी, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा हा प्रयत्न फेल झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

काँग्रेसने याआधी 1967-70 मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वात 520 पैकी 283 जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. त्यानंतरच्या 1971 च्या निवडणुकीत 520 पैकी 352 जागा काँग्रेसला मिळाल्या, मात्र त्यावेळी त्यांचा पक्ष वेगळा होता. प्रस्थापित काँग्रेस नेत्यांच्या विरोधात काँग्रेस इंडिकेट हा गट स्थापन करुन त्यांनी निवडणूक लढवली होती. प्रस्थापित काँग्रेसला त्यावेळी सिंडिकेट काँग्रेस म्हणायचे. याच 1971-77 टर्ममध्ये इंदिरा गांधींनी देशात दीड वर्ष आणीबाणी लागू केली.

आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाचं सरकार आलं. आता सत्तेत असलेल्या भाजपचा जुना अवतार म्हणजे जनसंघ जनता पक्षात सत्तेतील भागीदार होता. 1977 ते 79 या तीन वर्षात देशात मोरारजी देसाई आणि चौधरी चरणसिंग असे दोन पंतप्रधान झाले. त्यानंतर 1980 साली झालेल्या निवडणुकीत 353 जागा जिंकत इंदिरा गांधींनी पुनरागमन केलं. ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली.

त्यानंतर 1984 साली काँग्रेसने 404 जागा जिंकत पुन्हा सत्ता स्थापन केली आणि राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. आजवरच्या इतिहासात लोकसभा निवडणुकीत एका पक्षाने जिंकलेल्या या सर्वाधिक जागा आहेत. मात्र इंदिरा गांधीच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा त्यावेळी काँग्रेसला मिळाला.

2019 लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी कोणतीही सहानुभूतीही नाही किंवा पक्ष बदल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे केवळ मोदींचा करिष्मा दोन्ही निवडणुकीत पाहायला मिळाला असल्याचं दिसून येत आहे.

VIDEO | बीडमध्ये प्रीतम मुंडे विजयाच्या उंबरठ्यावर, पंकजा आणि प्रीतम मुंडेंशी चर्चा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
Embed widget