राज्यात चौथ्या टप्प्यात सरासरी 57 टक्के मतदानाची नोंद, तर चार टप्प्यात सरासरी 60.68 टक्के मतदान
आज पार पडलेल्या निवडणुकीत कल्याणमध्ये सर्वात कमी 44.27 टक्के मतदान झालं, तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक 67.34 टक्के मतदान झालं.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात आज राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. राज्यात सरासरी 57 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. आज पार पडलेल्या निवडणुकीत कल्याणमध्ये सर्वात कमी 44.27 टक्के मतदान झालं, तर नंदुरबारमध्ये सर्वाधिक 67.34 टक्के मतदान झालं.
चौथ्या टप्प्यातही ग्रामीण भागातील नागरिकांनी मतदानासाठी मोठा उत्साह दाखवल्याचं आणि शहरी भागातील नागरिकांनी मतदानाकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसून आलं आहे. राज्यात आज उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई , दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, भिवंडी, कल्याण, ठाणे, पालघर, नंदुरबार, मावळ, धुळे, शिर्डी , शिरुर, नाशिक, दिंडोरी या मतदारसंघात मतदान झालं.
VIDEO | निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
राज्यात चार टप्प्यात सरासरी 60.68 टक्के मतदान झालं. राज्यात एकूण 3 लाख 9 हजार दिव्यांग मतदार नोंदणी झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 7 लाख 50 हजार कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान दिलं. तर 1 लाख 4 हजार पोलिसांनीही यामध्ये आपली कामगिरी बजावली.
निवडणुकीदरम्यान एकूण 157 कोटींचा मुद्देमाल निवडणूक आयोगाने जप्त केला आहे. यामध्ये 53 कोटी 8 लाखांची रोख रक्कम, 70 कोटींचं सोनं, 34 कोटींची दारुचा समावेश आहे. तसेच यासंदर्भात 17 हजार 588 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आजच्या निवडणुकीची मतदारसंघनिहाय आकडेवारी
मतदारसंघ टक्केवारी प्रमुख लढत
उत्तर मुंबई 59.32 टक्के गोपाळ शेट्टी (भाजप) वि. उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)
उत्तर-पश्चिम मुंबई 54.71 टक्के गजानन किर्तीकर (शिवसेना) वि. संजय निरुपम (काँग्रेस)
उत्तर-पूर्व मुंबई 56.31 टक्के संजयदिना पाटील (राष्ट्रवादी) वि. मनोज कोटक (भाजप)
उत्तर-मध्य मुंबई 52.84 टक्के प्रिया दत्त (काँग्रेस) वि. पूनम महाजन (भाजप)
दक्षिण-मध्य मुंबई 55.35 टक्के राहुल शेवाळे (शिवसेना) वि. एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
दक्षिण मुंबई 52.15 टक्के मिलिंद देवरा (काँग्रेस)वि. अरविंद सावंत (शिवसेना)
भिवंडी 53.68 टक्के कपिल पाटील (भाजप) वि. सुरेश टावरे (काँग्रेस)
कल्याण 44.27 टक्के श्रीकांत शिंदे (शिवसेना) वि. बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
ठाणे 49.95 टक्के राजन विचार (शिवसेना) वि. आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
पालघर 64.09 टक्के राजेंद्र गावित (शिवसेना) वि. बळीराम जाधव (बविआ)
नंदुरबार 67.64 टक्के डॉ. हीना गावित (भाजप) वि. के सी पाडवी (काँग्रेस)
मावळ 59.12 टक्के श्रीरंग बारणे (शिवसेना) वि. पार्थ पवार (राष्ट्रवादी)
धुळे 67.29 टक्के कुणाल पाटील (काँग्रेस) वि. डॉ. सुभाष भामरे (भाजप)
शिर्डी 60.42 टक्के सदाशिव लोखंडे (शिवसेना) वि. भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
शिरुर 59.55 टक्के शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना) वि. अमोल कोल्हे
नाशिक 55.41 टक्के हेमंत गोडसे (शिवसेना) वि. समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
दिंडोरी 64.24 टक्के भारती पवार (भाजप) वि. धनराज महाले (राष्ट्रवादी)
सरासरी - 57 टक्के
चौथ्या टप्प्यात गोपाळ शेट्टी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, पूनम महाजन, प्रिया दत्त, अरविंद सावंत, मिलिंद देवरा, गजानन किर्तीकर, संजय निरुपम, अजित पवारांने पुत्र पार्थ पवार, आढळराव पाटील, अभिनेते अमोल कोल्हे, समीर भुजबळ या चर्चेत राहिलेल्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत कैद झालं आहे. 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.