एक्स्प्लोर
Advertisement
देशातील व्हीआयपी लढती : दिग्गजांना झटका बसणार, एक्झिट पोलचा अंदाज
या पोलमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह, सोनिया गांधी, राहुल गांधी, नरेंद्र मोदी, मनेका गांधी, आझम खान, वरुण गांधी, हेमा मालिनी, रविशंकर प्रसाद, ज्याोतिरादित्य सिंधिया हे जिंकतील तर जयाप्रदा, बाबूल सुप्रियो, स्मृती इराणी, सत्यपाल सिंह, राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा, दिग्विजय सिंह यांना पराभव स्वीकारावा लागेल, असा अंदाज या सर्वेत व्यक्त केला आहे.
मुंबई : लोकसभेच्या निकालाचे वेध सर्वांना लागले आहेत. अनेक वाहिन्यांचे आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर आल्यानंतर एनडीएचे सरकार स्थापन होण्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. देशातील अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर येण्याची चिन्हे आहेत. यात देशातील काही व्हीआयपी लढतींचा एक्स्लुझिव्ह एक्झिट पोल समोर आला आहे.
या पोलमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह, सोनिया गांधी, राहुल गांधी, नरेंद्र मोदी, मनेका गांधी, आझम खान, वरुण गांधी, हेमा मालिनी, रविशंकर प्रसाद, ज्याोतिरादित्य सिंधिया हे जिंकतील तर जयाप्रदा, बाबूल सुप्रियो, स्मृती इराणी, सत्यपाल सिंह, राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा, दिग्विजय सिंह यांना पराभव स्वीकारावा लागेल, असा अंदाज या सर्वेत व्यक्त केला आहे.
दिग्विजय सिंहांचा पराभव करत भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह जिंकतील
भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या साध्वी प्रज्ञा सिंह जिंकतील, दिग्विजय सिंह यांचा पराभव होईल, असा अंदाज एबीपी एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला आहे. साध्वींच्या उमेदवारीपासूनच त्यांच्या नावाला विविध स्तरांतून विरोध होता. साध्वींच्या वादग्रस्त वक्तव्यांनी देखील मोठी चर्चा झाली. मात्र तरीही भाजपने त्यांची उमेदवारी कायम ठेवली.
उत्तरप्रदेशातील सुलतानपूर मतदारसंघातून भाजपच्या मनेका गांधी जिंकतील, असा अंदाज आहे. बसपाचे सोनू सिंह पराभूत होतील असा एबीपी एक्झिट पोलचा अंदाज आहे.
आझम खान जयाप्रदांना पराभूत करणार?
उत्तरप्रदेशातील रामपूर मतदारसंघातून सपाचे आझम खान विजयी होतील तर भाजपच्या जयाप्रदा यांना पराभूत होतील, असा एबीपी एक्झिट पोलचा अंदाज आहे. जया प्रदा आणि आझम खान यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. जया प्रदा यांनी आझम खान यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आझम खान यांनी माझ्यावर अॅसिड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भीतीनं मी राजकारणापासून दूर झाले, असा आरोप जया प्रदा यांनी केला होता.
सोनिया आणि राहुल गांधी पुन्हा जिंकणार?
रायबरेलीमधून सोनिया गांधी पुन्हा एकदा निवडणूक जिंकतील तर दिनेश प्रताप सिंग पराभूत होतील, असा एबीपी एक्झिट पोलचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून सोनिया पाचव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. सोनिया गांधी 2004 पासून पारंपारिक रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहे.
तर दुसरीकडे अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे राहुल गांधी विजयी होतील, तर भाजपच्या स्मृती इराणी पुन्हा एकदा पराभूत होतील,असा एबीपी एक्झिट पोलचा अंदाज आहे. राहुल गांधी हे वायनाडमधून देखील निवडून येतील, असा अंदाज आहे.
वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदीचाच विजय
वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी होतील, शालिनी यादव पराभूत होतील, एबीपी एक्झिट पोलचा अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मधील लोकसभा निवडणुकांच्या वेळी उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि होम ग्राऊंड गुजरातमधील बडोदा अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही जागांवर ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. बडोद्याची जागा मोदींनी पाच लाख 70 हजार 128 मतांच्या फरकाने जिंकली होती, तर वाराणसीतून तीन लाख 71 हजार 784 च्या मताधिक्याने मोदींनी 'आप'च्या अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता.
बाबूल सुप्रियोंचा पराभव करत मुनमुन सेन विजयी होतील, असा अंदाज
कोलकात्यात आसनसोल मतदारसंघातून भाजपचे बाबूल सुप्रियो पराभूत होतील तर तृणमूल काँग्रेसच्या मुनमुन सेन विजयी होतील, असा एबीपी एक्झिट पोलचा अंदाज आहे. तृणमूल काँग्रेसने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुनमुन सेन यांना बंकुरा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मुनमुन सेन यांनी CPIM च्या बासुदेव आचारिया या खंद्या उमेदवाराचा पराभव केला होता. बंकुरा मतदारसंघात मुनमुन सेन यांचा करिश्मा यशस्वी झाला. आताही तोच करिश्मा होईल, असा अंदाज आहे.
पिलीभीत मतदारसंघातून भाजपचे वरुण गांधी जिंकतील तर सपाचे हेमराज वर्मा पराभूत होतील, असा एबीपी एक्झिट पोलचा अंदाज आहे.
बागपत मतदारसंघातून रालोदचे जयंत चौधरी विजयी होतील तर भाजपच्या केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांना पराभव स्वीकारावा लागेल, असा अंदाज आहे. तर मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या हेमा मालिनी विजयी होतील तर रालोदचे नरेंद्र सिंह पराभूत होतील, असा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्रीमधून काँग्रेसचे राज बब्बर पुन्हा एकदा पराभूत होतील, त्यांच्याऐवजी भाजपच्या राजकुमार चाहर यांना लोकांची अधिक पसंती मिळेल, असा एबीपी एक्झिट पोलचा अंदाज आहे. तर बिहारच्या पटना साहिबमधून भाजपचे रविशंकर प्रसाद काँग्रेसच्या शत्रुघ्न सिन्हा यांना धूळ चारतील, असा अंदाज आहे. शत्रुघ्न सिन्हा हे 2014 च्या लोकसभेत भाजपकडून संसदेत गेले होते. मात्र त्यांनी वेळोवेळी भाजप सरकारवर शरसंधान करत शेवटी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मध्यप्रदेशातील गुना मतदारसंघातून पुन्हा ज्याोतिरादित्य सिंधिया काँग्रेस जिंकणार असल्याचा अंदाज आहे. यावेळी त्यांचा सामना भाजपच्या के पी यादव यांच्याशी आहे. गुना लोकसभा मतदारसंघातून सिंधिया 2014 च्या लोकसभेत 5 लाखाहून अधिक मतं घेत विजयी झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement