एक्स्प्लोर

भाजपच्या दुसऱ्या यादीतही घटक पक्षांना स्थान नाही, रासपच्या कुल यांना भाजपकडून उमेदवारी, जानकरांनी बोलावली बैठक

या पार्श्वभूमीवर रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुण्यात तातडीची बैठक बोलावली आहे. घटक पक्षांना डावलल्याने आता रासपची पुढची भूमिका ठरवण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची बैठक जानकर यांनी बोलावली असल्याची माहिती आहे.

मुंबई : भाजपची दुसरी यादी काल रात्री उशिरा घोषित करण्यात आली. या दुसऱ्या यादीतही दुसऱ्या यादीतही घटक पक्षांना स्थान देण्यात आलेलं नसल्याने घटक पक्षांमधून नाराजीचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर रासपचे महादेव जाणकार यांनी आज बैठक बोलावली आहे. बारामतीच्या जागेवरून कांचन कुल यांना उमेदवारी घोषित केली आहे, मात्र त्या कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत.
कांचन कुल या रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत मात्र त्या भाजपच्या उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर रासप अध्यक्ष महादेव जानकर यांनी  पुण्यात तातडीची बैठक बोलावली आहे. घटक पक्षांना डावलल्याने आता रासपची पुढची भूमिका ठरवण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची  बैठक जानकर यांनी बोलावली असल्याची माहिती आहे.
कोण आहेत कांचन कुल
- पुणे जिल्ह्यातील दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आहेत कांचन कुल
- राहुल कुल हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार
- राहुल कुल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटचे सहकारी मानले जातात
- कांचन कुल यांचे माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर
- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या  जवळच्या नातेवाईक
- राहुल कुल यांच्या विधानसभेच्या प्रचारात कांचन कुल दौंडमध्ये सक्रिय होत्या
Loksabha Election 2019 : महाआघाडीत मित्रपक्षाला जागा सोडण्यावरून गोंधळ अजूनही कायम
भाजप - शिवसेना युतीकडून उमेदवारांचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले असताना दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मित्रपक्षांमध्ये जागा सोडण्यावरून गोंधळ अजूनही कायम आहे. आज महाआघाडीची घोषणा होणार आहे. दक्षिण नगरची जागा जशी काँग्रेसला हवी होती तशी राष्ट्रवादीने औरंगाबादची जागा काँग्रेसकडे मागितली होती. औरंगाबादच्या बदल्यात नगर असा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिला होता. पण नगरची जागा राष्ट्रवादीने सोडली नाही आणि सुजय विखे पाटील सोडून गेले. तसेच काँग्रेसने पण औरंगाबाद जागा सोडली नाही आणि उमेदवार जाहीर करून टाकला आहे. आघाडी झाली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये शेवटपर्यंत आपल्याला हव्या असणाऱ्या जागांबाबत रस्सीखेच शेवटपर्यंत सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने हातकणंगले जागा सोडली तर काँग्रेसने आपल्या कोट्यातून एक जागा सोडणे अपेक्षित होते. सांगली जागा सोडण्याचे ठरवले पण काँग्रेसमधील गटाने बंड केल्याने अजूनही त्या जागेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला काँग्रेस आपल्या कोट्यातून सोडत आहे.

लोकसभेच्या निवडणुकांचा रोमांच शिगेला पोहोचला आहे. राज्यात बहुतांश महायुती, महाआघाडी, मित्रपक्षांसह वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली आहे. काही जागांवर अद्याप उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली नाहीये. मात्र राज्यातील बहुतांश जागांवर कुणाच्या विरोधात कोण लढणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

WATCH | महाराष्ट्रात लोकसभेच्या रिंगणात कुणाची कुणाशी लढत? | आमने-सामने लढती | एबीपी माझा

शिवसेना भाजप युतीच्या पाच जागा जाहीर झालेल्या नाहीत.  भंडारा- गोंदिया, पालघर, ईशान्य मुंबई,  सातारा, माढा या जागांवरील उमेदवारांची घोषणा झालेली नाही.  दुसरीकडे, महाआघाडीची आज घोषणा होणार आहे, मात्र तब्बल 14 ठिकाणची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. जळगाव, रावेर, भंडारा- गोंदिया, अमरावती, अकोला, रामटेक, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, पालघर,  मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम,  पुणे,  सांगली,  हिंगोली,  नांदेड या जागांवर महाआघाडीचे उमेदवार घोषित झालेले नाही.

राज्यात अशा असतील थेट लढती 1.    सोलापूर- सुशीलकुमार शिंदे (CONG) विरुद्ध  जयसिध्देश्वराय स्वामी (BJP) 2.    बारामती- सुप्रिया सुळे (NCP) विरुद्ध  कांचन कुल ( BJP) 3.    दिंडोरी-  धनराज महाले (NCP) विरुद्ध  डॉ.भारती पवार ( BJP) 4.    चंद्रपूर- विनायक बांगडे  ( CONG) विरुद्ध  हंसराज अहिर (BJP) 5.    भिवंडी-  सुरेश तावरे ( CONG) विरुद्ध  कपिल पाटील (BJP) 6.    औरंगाबाद- सुभाष झांबड (CONG) विरुद्ध  चंद्रकांत खैरे ( SENA) 7.    जालना- विलास औताडे ( CONG) विरुद्ध  रावसाहेब दानवे (BJP) 8.    लातूर-  मच्छिंद्र कामंत ( CONG) विरुद्ध  डॉ. सुधाकर शृंगारे (BJP) 9.    नाशिक- समिर भुजबळ(NCP) विरुद्ध  हेमंत गोडसे (SENA) 10.    बुलडाणा-  राजेंद्र शिंगणे( NCP) विरुद्ध  प्रतापराव जाधव (SENA) 11.    यवतमाळ- माणिकराव ठाकरे (CONG) विरुद्ध  भावना गवळी ( SENA) 12.    रायगड-  सुनिल तटकरे(NCP)  विरुद्ध  अनंत गिते (SENA) 13.    कल्याण- बाबाजी पाटील(NCP) विरुद्ध  श्रीकांत शिंदे (SENA) 14.    ठाणे- आनंद परांजपे(NCP) विरुद्ध  राजन विचारे (SENA) 15.    मुंबई दक्षिण मध्य-  एकनाथ गायकवाड (CONG) विरुद्ध  राहुल शेवाळे (SENA) 16.    मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा (CONG) विरुद्ध  अरविंद सावंत (SENA) 17.    मावळ- पार्थ पवार(NCP) विरुद्ध  श्रीरंग बारणे( SENA) 18.    शिरुर- अमोल कोल्हे(NCP) विरुद्ध  शिवाजीराव आढळराव (SENA) 19.    शिर्डी- भाऊसाहेब कांबळे (CONG) विरुद्ध  सदाशिव लोखंडे (SENA) 20.    कोल्हापूर- धनंजय महाडिक(NCP) विरुद्ध  संजय मंडलिक (SENA) 21.    हातकणंगले- राजू शेट्टी ( स्वाशेसं)  विरुद्ध  धर्यशील माने (SENA) 22.    परभणी- राजेश विटेकर (NCP) विरुद्ध  संजय जाधव (SENA) 23.    नंदुरबार ( एसटी)-  के. सी पाडवी (CONG) विरुद्ध  हिना गावित (BJP) 24.    धुळे-  कुणाल पाटील (CONG) विरुद्ध  डॉ. सुभाष भामरे (BJP) 25.    वर्धा- चारुलता टोकस (CONG) विरुद्ध  रामदास तडस (BJP) 26.    नागपूर-  नाना पटोले (CONG) विरुद्ध  नितीन गडकरी (BJP) 27.    गडचिरोली-  डॉ. नामदेव उसेंडी( CONG)  विरुद्ध  अशोक  नेते 28.    मुंबई- उत्तर-मध्य-  प्रिया दत्त (CONG) विरुद्ध  पूनम महाजन (BJP) 29.    अहमदनगर-  संग्राम जगताप (NCP) विरुद्ध  डॉ. सुजय विखे पाटील (BJP) 30.    बीड-   डॉ. प्रीतम मुंडे (BJP) विरुद्ध  बजरंग सोनवणे(NCP) संबंधित बातम्या लोकसभा निवडणूक : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा
लोकसभा निवडणूक : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट
लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी, महाराष्ट्रातील 21 उमेदवार जाहीर
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा
काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, माणिकरावांसह एकनाथ गायकवाडांना उमेदवारी
लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात
लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर
लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget