एक्स्प्लोर

पालघरमध्ये भाजप-शिवसेना मनोमिलन नाहीच, जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी नाराज?

शिवसेनेच्या उमेदवारासाठी पालघर जिल्ह्यातील भाजपाचा कोणताही कार्यकर्ता आणि पदाधिकारी प्रचार करणार नसून त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्धार केला आहे. तर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बुधवारी आपापल्या पदांचे राजीनामे वरिष्ठांकडे देऊन ते मुख्यमंत्र्यांना सोपविणार असल्याचे सांगण्यात आले.

पालघर : पालघर लोकसभेची भाजपाची पारंपारिक हक्काची जागा शिवसेनेला बहाल केल्याने जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मतदान करायचे तर कोणत्या निशाणीवर कारायचे हा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बैठकांचे सत्र सुरु केले आहे. नुकतीच मनोरजवळील चिल्हार फाट्याजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गा लगत भाजपचे कार्यकर्ते मढवी यांच्या श्री गणेश बंगल्यावर पालघर जिल्ह्यातील सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपापले मत व्यक्त केले. त्यामध्ये प्रामुख्याने चर्चा करण्यात आली की, शिवसेनेच्या उमेदवारासाठी पालघर जिल्ह्यातील भाजपाचा कोणताही कार्यकर्ता आणि पदाधिकारी प्रचार करणार नसून त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्धार केला आहे. तर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बुधवारी आपापल्या पदांचे राजीनामे वरिष्ठांकडे देऊन ते मुख्यमंत्र्यांना सोपविणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालघर लोकसभा अज २२ या जागेसाठी होणारी निवडणूक अतिशय चुरशीची होणार यात शंकाच नाही. नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीवेळी मयत खासदार चिंतामण वणगा यांच्या कुटुंबियांकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याने, वनगा कुटुंबीय नाराज झालं. यानंतर श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश घेऊन खासदारकीची निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली. तर राजेंद्र गवितांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश घेतला आणि विजय मिळवला. मात्र आता ही जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे खासदार राजेंद्र गावितांची नामुष्की झाली आहे. पूर्वीपासून ही जागा भाजपाकडे असल्यामुळे आणि युतीच्या वाटाघाटीत पालघर लोकसभा शिवसेनेने हट्टहास करुन मागितल्याने भाजपाकडे पर्यायी कोणताच मार्ग मोकळा राहिलेला नाही. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने पालघरच्या जागेवरच शिवसेनेने का अडून बसावे असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी केला. त्यातच खासदार गवितांनी हाताला शिवबंधन बांधून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली आहे. ही सर्व राजकीय खेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत करत असून ते बहुजन विकास आघाडीचे समर्थक आहेत, असा घणाघाती आरोप या बैठकीत उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी केला. राऊतांना पालघरच्या जागेसाठी शिवसेनेचाच उमेदवार का हवा आहे? असा प्रश्न ही यावेळी उपस्थित केला असून कमळ चिन्ह सोडून धनुष्यबाणाचे बटन दाबून मतदान कसे करावे यासाठी आमचे मन मानत नाही. परंतु देशात पुन्हा भाजपाची सत्ता आणण्यासाठी आपल्याला एक पाऊल मागे येऊन नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला गवितांना मदत ही करावीच लागेल असे प्रतिपादन उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले. या बैठकीस प्रदेश कार्यकारणी सदस्य चंदूलाल घरत, समन्वयक मधुकर पाटील, प्रमोद आरेकर, अनिल शेलार, सुजीत पाटील, भूषण पाटील, उमेश सपकाळ, महावीर सोळंकी, शशांक राऊत, स्वप्नील किणी, विजय औसरकर त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापली खंत बैठकीत व्यक्त केली. त्यामध्ये खास करुन उल्लेखनीय बाब म्हणजे राजेंद्र गाविताना सेनेतून उमेदवारी देण्याऐवजी भारतीय जनता पक्षातूनच देण्यात यावी, त्यासाठी वरिष्ठांनी आमचं म्हणणं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवावं, अशी कळकळीची विनंती काही कार्यकर्त्यांनी उपस्थित प्रमुख पदाधिकारी यांना केली.
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
Maharashtra Live: तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 

व्हिडीओ

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
Maharashtra Live: तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात, आठ दिवसांच्या मंचकी निद्रानंतर देवी सिंहासनावर विराजमान
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला धक्का; मलबार हिलमधील मनसेच्या पदाधिकार्‍यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
BCCI कडून दक्षिण आफ्रिका दौरा आणि वर्ल्ड कपसाठी भारताचा U19 संघ जाहीर, वैभव सूर्यवंशी कर्णधार; आयुष म्हात्रे वर्ल्ड कपमध्ये नेतृत्त्व करणार 
BCCI कडून वैभव सूर्यवंशीवर मोठी जबाबदारी, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर, U19 टीममध्ये कोणाला संधी? 
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
PNB :  पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच दिली अपडेट, बँकेच्या शेअरचं काय होणार? गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं
पंजाब नॅशनल बँकेत  2434  कोटींचा कर्ज घोटाळा, बँकेनंच मोठी दिली अपडेट, नेमकं काय घडलं?
BMC Election : मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह रिंगणात उतरणार?
मोठी बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
मुंबई महापालिकेसाठी आत्तापर्यंत 10 हजार 343 अर्जांची विक्री; 44 नामनिर्देश पत्र दाखल, उरले दोनच दिवस
Embed widget