काँग्रेसकडून उमेदवारांची नववी यादी जाहीर, चंद्रपुरात विनायक बांगडेंऐवजी सुरेश धानोरकरांना उमेदवारी
चंद्रपुरातून विनायक बांगडे यांना हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. बांगडे यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपूरमधील अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीरमधील 10 उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील चार उमेदवारांचा यादीत समावेश आहे.
#BREAKING काँग्रेसकडून उमेदवारींची नववी यादी जाहीर, चंद्रपुरातून विनायक बांगडे यांच्याऐवजी सुरेश धानोरकरांना उमेदवारी जाहीर, रामटेकमधून किशोर गजभिये, हिंगोलीतून सुभाष वानखेडे, अकोल्यातून हिदायत पटेल यांना उमेदवारी pic.twitter.com/uVTmbvgdNz
— ABP माझा (@abpmajhatv) March 24, 2019
या नवव्या यादीत चंद्रपुरातून सुरेश धानोरकर, रामटेकमधून किशोर गजभिये, हिंगोलीतून सुभाष वानखेडे, अकोल्यातून हिदायत पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नवव्या यादीचं महत्त्व म्हणजे चंद्रपूर येथे विनायक बांगडे यांना जाहीर केलेली उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तर त्यांच्या जाहीर सुरेश (बाळू) धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
चंद्रपुरातून विनायक बांगडे यांना हंसराज अहिर यांच्याविरोधात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. बांगडे यांच्या उमेदवारीमुळे चंद्रपूरमधील अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते. एका नाराज कार्यकर्त्याने याबाबत फोन करुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना विचार केली होती. त्यावर माझं पक्षात कुणी एकत नाही असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत हायकमांडने चंद्रपुरातून धानोरकरांना उमेदवारी दिली आहे.काँग्रेसची उमेदवार यादी
- नंदुरबार - के. सी. पडवी
- धुळे - कुणाल रोहिदास पाटील
- वर्धा - चारुलता टोकस
- मुंबई दक्षिण मध्य - एकनाथ गायकवाड
- यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे
- शिर्डी- भाऊसाहेब कांबळे
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नवीनचंद्र बांदिवडेकर
- नागपूर - नाना पटोले
- सोलापूर - सुशीलकुमार शिंदे
- मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त
- मुंबई दक्षिण - मिलिंद देवरा
- गडचिरोली-चिमूर - डॉ. नामदेव उसेंडी
- चंद्रपूर- सुरेश (बाळू) धानोरकर
- जालना- विलास औताडे
- औरंगाबाद- सुभाष झांबड
- भिवंडी - सुरेश टावरे
- लातूर- मच्छिंद्र कामनात
- नांदेड- अशोक चव्हाण
- रामटेक- किशोर गजभिये
- हिंगोली- सुभाष वानखेडे
- अकोला- हिदायत पटेल