एक्स्प्लोर

Loksabha Election 2019 6th phase : लोकसभेच्या सहाव्या टप्प्यासाठी 7 राज्यातील 59 जागांसाठी आज मतदान, दिग्गज मैदानात

या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील सर्व 10 जागांशिवाय उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8-8 तर झारखंडमधील 4 जागांवर मतदान होत आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांमधील 59 जागांवर आज मतदान होत आहे. या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील सर्व 10 जागांशिवाय उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8-8 तर झारखंडमधील 4 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात 10 कोटी 16 लाख हून  अधिक मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. झारखंडमधील धनबाद वगळता उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणासह बाकीच्या राज्यांमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 979 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. मध्य प्रदेशमधली भोपाळ, नवी दिल्ली आणि आझमगडच्या जागांवर दिग्गजांची अग्निपरीक्षा असेल. भोपाळमध्ये भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह विरोधात काँग्रेसचे दिग्विजय मैदानात आहेत. साध्वी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भोपाळची निवडणूक ही चर्चेत राहिली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी देखील साध्वी प्रज्ञासिंहला टक्कर देण्यासाठी प्रचारादरम्यान सॉफ्ट हिंदुत्वाचा वापर केला. लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चिली गेली ती भोपाळजी जागा. कारण काँग्रेसच्या दिग्विजय सिंहांविरोधात भाजपनं इथे प्रज्ञा साध्वीला उतरवलं. साध्वीच्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच ती चर्चेत राहिली. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचा गढ असलेल्या आजमगढमध्ये यावेळी अखिलेश यादव रिंगणात आहेत. वडील मुलायमसिंह यादव यांच्या जागी अखिलेश यंदा या जागेवरून लढत आहेत. याशिवाय मनेका गांधी यांनीही यावेळेला आपला मतदारसंघ बदलला आहे. विद्यमान खासदार आणि मुलगा वरूण गांधींची जागा असलेल्या सुल्तानपूरमधून मनेका गांधी रिंगणात आहेत. मध्यप्रदेश मधील मुरैना येथून केंद्रीय मंत्री नरेन्द्र सिंह तोमर भाजपकडून मैदानात आहेत. गुनामधून काँग्रेसचे नेते कांग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया मैदानात आहेत. तर हरियाणामधून माजी मुख्यमंत्री भूपेन्द्र सिंह हुड्डा काँग्रेसकडून मैदानात आहेत. दिल्लीमधून मुख्यमंत्री शीला दीक्षित काँग्रेसकडून उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून तर केंद्रीय मंत्री हर्षवर्धन भाजपकडून चांदनी चौक मतदारसंघातून लढत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात होणार महत्त्वाचा बदल, 'त्या' लोकल ट्रेन CSMT नव्हे तर दादर स्थानकातून सुटणार
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, 5 ऑक्टोबरपासून वेळापत्रकात होणार महत्त्वाचे बदल
Embed widget