एक्स्प्लोर
गोव्यात मतदारांमध्ये उत्साह; दुपारी एक वाजेपर्यंत 45.26 टक्के मतदान
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं.
पणजी : गोव्यात आज लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. आज सकाळपासूनच मतदार घराबाहेर पडून मतदान करत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत 45.11 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं. सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात जवळपास 13 टक्के मतदान उत्तर आणि दक्षिण गोव्यात झाले होते. दुपारी अकरा वाजेपर्यंत त्यात भरच पडत गेली. मतदानासाठी असलेली सुट्टी सार्थकी लावत मतदार मतदानासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. तापमान 34 अंश सेल्सिअस असूनही लोक मतदानासाठि घराबाहेर पडत आहेत.
उत्तर गोव्यात दुपारी अकरा वाजेपर्यंत 26.52 टक्के तर दक्षिण गोव्यात 26.58 टक्के मतदान झालं होतं. दोन्ही ठिकाणचे मिळून एकूण मतदान 26.55 टक्के होते. लोकसभेबरोबर विधानसभेच्या पोटनिवडणुकांसाठीही भरघोस मतदान झालं. शिरोडा पोटनिवडणुकीसाठी सकाळी अकरा वाजेपर्यंत 29.16, म्हापशात 26.81 तर मांद्रे मतदारसंघात 25.60 टक्के मतदान झालं होतं.
दुपारी एक वाजता हाती आलेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यात 46.26 टक्के, दक्षिण गोव्यात 43.97 टक्के मतदान झालं. त्याची एकूण टक्केवारी 45.11 टक्के आहे. शिरोडा पोटनिवडणुकीसाठी 45.26 टक्के, म्हापशात 47.19 टक्के तर मांद्रे मतदारसंघात 45.95 टक्के मतदान झालं आहे. सायंकाळपर्यंत ही टक्केवारी वाढत जाईल, अशी चिन्हे सध्या दिसत आहेत.
ईव्हीएम बिघडल्याच्या अनेक तक्रारी आल्या असून त्यामुळे काही मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेत अडथळे आल्याची माहिती आहे.
VIDEO | पर्रिकरांचा वारसा पुढे नेणार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची पहिली प्रतिक्रिया | पणजी | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement