एक्स्प्लोर

Lok Sabha Election NDA : चंद्राबाबू आणि नीतिशकुमार यांचे दबावतंत्र; भाजपकडे केली महत्त्वाची मागणी, सरकारमध्ये येतो पण...

Lok Sabha Election NDA TDP JDU : मागील 10 वर्षात भाजपला बहुमतापेक्षा कमी संख्याबळ मिळाले आहे. त्यामुळे आता केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

Lok Sabha Election NDA TDP JDU : लोकसभा निवडणूक निकालानंतर आता देशातील सत्तेची समीकरणे चांगलीच बदलली आहे. भाजपला 240 जागांवर विजय मिळाला आहे. मागील 10 वर्षात भाजपला बहुमतापेक्षा कमी संख्याबळ मिळाले आहे. त्यामुळे आता केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू ( N. Chandrababu Naidu) यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. दोन्ही पक्षांनी भाजपवर दबाव तयार करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे वृत्त आहे. 

'इंडियन एक्सप्रेस'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात हा दावा केला आहे. नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांनी लोकसभेचे अध्यक्षपदावर दावा केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता, भाजप नेतृत्त्व काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा अध्यक्षपदाची मागणी का?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  भविष्यात संभाव्य पक्ष फुटीपासून आघाडीतील मित्र पक्षांना वाचवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षांतरविरोधी कायद्यात सभापतींची भूमिका महत्त्वाची असते. सूत्रांनी सांगितले की, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनीही अध्यक्षपदासाठी भाजपच्या इतर काही मित्रपक्षांशी चर्चा केली आहे. मात्र, बुधवारी नवी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत नायडू आणि नितीशकुमार अधिकृतपणे ही मागणी मांडतील की नाही हे स्पष्ट झालेले नाही. या बैठकीला दोन्ही नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

पक्षांतराच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयालाही मर्यादित अधिकार आहेत. अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यात लोकसभा अध्यक्षांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. मावळत्या लोकसभा अध्यक्षांसमोर अपात्रतेची प्रकरणे प्रलंबित होती. त्याशिवाय, महाराष्ट्रातही शिवसेना पक्षफुटी प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यावर निर्णय घेतला होता. पक्ष फुटीपासून वाचण्यासाठी लोकसभा अध्यक्षपद महत्त्वाचे ठरत असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळेच आता तेलगू देसम आणि जेडीयूकडून लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करण्यात आली असावी अशी चर्चा आहे.

वाजपेयींच्या काळात मित्रपक्षांना मान, मोदींकडून दुर्लक्ष?

अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रात भाजपची सत्ता असताना लोकसभेचे अध्यक्षपद हे मित्रपक्षांना देण्यात आले होते.  तेलगू देसम पक्षाचे जीएमसी बालयोगी, शिवसेनेचे मनोहर जोशी यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर मित्रपक्षांना अध्यक्षपद देण्यात आले नव्हते. त्याशिवाय, लोकसभेच्या उपाध्यक्षपदी देखील निवड करण्यात आली नव्हती. लोकसभेच्या उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षांकडे देण्यात येते. 

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?

देशपातळीवरील समीकरणं

एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1


महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde On Rahul Gandhi : हिंदू संयमी; योग्यवेळी राहुल गांधींना उत्तर मिळेल - एकनाथ शिंदेUruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवलाVishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदमABP Majha Headlines : 2 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
Isha Ambani : शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
शाहरुखचे 'हे' तीन चित्रपट पाहून रडलीय ईशा अंबानी, सांगितले आवडत्या दिग्दर्शकाचे नाव
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Embed widget