मोठी बातमी : नाशिकमधून हेमंत गोडसे पराभवाच्या छायेत, राजाभाऊ वाजे तब्बल 94 हजार मतांनी आघाडीवर
Nashik Lok Sabha Election Results 2024 : नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे पिछाडीवर आहेत.
Nashik Lok Sabha Election Results 2024 : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासात देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी दहाव्या फेरीअंती तब्बल 94 हजार 735 मतांची आघाडी घेतली आहे. तर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे पराभवाच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचे दिसून येत आहे.
-
नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत होत आहे. राजाभाऊ वाजे यांना पहिल्या फेरी अखेरीस 10752 मतांची आघाडी घेतली होती.
नाशिकमधून राजाभाऊ वाजे आघाडीवर
तर दुसऱ्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे यांनी तब्बल 19 हजर 700 मतांनी आघाडी घेतली आहे. तर तिसऱ्या फेरीअखेर राजाभाऊ वाजे यांनी तब्बल 30 हजार मतांनी आघाडी घेतली. तर दहाव्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे यांनी तब्बल 94 हजार 735 मतांची आघाडी घेतली आहे. तसेच राजाभाऊ वाजे यांच्या नावाचे नाशिकमध्ये फलक झळकायला सुरुवात झाली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा होर्डिंग्जवर राजभाऊ वाजे यांचा खासदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तर सिन्नरच्या बूथ क्रमांक 7 वर मतमोजणी थांबवण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून मतदान अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. EVM ची बॅटरी कमीच होत नसल्याचा आरोप ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी केला आहे.
दिंडोरीतून भास्कर भगरे आघाडीवर
तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी संपली असून फेर मतमोजणीनंतर आलेल्या आकडेवारीत महाविकास आघाडीचे भास्कर भगरे 1435 मतांनी आघाडीवर आहेत.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे आघाडीवर
190 मतांनी सुजय विखे आघाडीवर
निलेश लंके यांना 18254 मतं
सुजय विखेंना 18444 मतं
एकूण मतदान 36698
इतर महत्वाच्या बातम्या