Nandurbar Lok Sabha Election Result 2024 : राज्यात मविआचा पहिला विजय जवळपास निश्चित, नंदुरबारमधून गोवाल पाडवी आघाडीवर
Nandurbar Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पहिला विजय जवळपास निश्चित झाला आहे. नंदुरबारमधून गोवाल पाडवी (Goval Padvi) यांनी विजयी आघाडी घेतली आहे.
![Nandurbar Lok Sabha Election Result 2024 : राज्यात मविआचा पहिला विजय जवळपास निश्चित, नंदुरबारमधून गोवाल पाडवी आघाडीवर Lok Sabha Election Results 2024 Nandurbar Congress Candidate Goval Padvi on his way to victory a lead one lakh vote against BJP Candidate Heena Gavit Maharashtra Marathi News Nandurbar Lok Sabha Election Result 2024 : राज्यात मविआचा पहिला विजय जवळपास निश्चित, नंदुरबारमधून गोवाल पाडवी आघाडीवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/04/db985cfc7934cdc0cbdc68f31f2ebadb1717480706171923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nandurbar Lok Sabha Election Result 2024 : गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पहिला विजय जवळपास निश्चित झाला आहे. नंदुरबारमधून गोवाल पाडवी (Goval Padvi) हे विजयी आघाडी घेतली आहे.
नंदुरबारमध्ये भाजपच्या उमेदवार हीना गावित (Heena Gavit) या पिछाडीवर आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी हे 22 व्या फेऱ्यात 1 लाख 64 हजार मतांनी आघाडीवर आहेत. आता गोवाल पाडवी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
नंदुरबार काँग्रेस काबीज करणार
हिना गावित यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. तर गोवाल पाडवी यांच्यासाठी प्रियांका गांधी यांनी सभा घेतली होती. नंदुरबार हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मधल्या काळात भाजपाने येथे बस्तान बसवले होते. मात्र आता नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेस काबीज करणार असे दिसून येत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)