एक्स्प्लोर

Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढवली, 150 विधानसभा मतदारसंघांमध्ये मविआची आघाडी; महायुतीसाठी धोक्याचा इशारा

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या आहेत. तर मविआने 30 जागांवर विजय मिळवला आहे. हेच समीकरण विधानसभानिहाय लागू केल्यास आगामी निवडणुकीत मविआ 150 जागा जिंकू शकते.

मुंबई: देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप्रणित (BJP) आघाड्यांची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला (Mahayuti) अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची (MVA Alliance) 30 जागांवर सरशी झाली आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) कायम राहिला तर महायुतीची सत्ता जाणे अटळ आहे. येत्या चार महिन्यांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे जनमताची हीच हवा कायम राहिल्यास महाविकास आघाडीला 150 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागांवर विजय मिळू शकतो. तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित मजल 125 जागांपर्यंत जाऊ शकते. महाराष्ट्रात विधानसभेतील बहुमताचा आकडा 145 इतका आहे. त्यामुळे 150 जागांवर विजय मिळाल्यास आगामी निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी सहजपणे सत्तेत येऊ शकते, असे लोकसभेच्या आकडेवारीवरुन दिसत आहे.

एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यानुसार राज्यातील लोकसभेच्या 48 जागांची 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागणी होते. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत 30 जागा जिंकल्या आहेत. या 30 जागांवरील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्य मिळाले होते. तर महायुतीने लोकसभेच्या 17 जागांवर विजय मिळवला. सांगलीच्या जागेवर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा विजय झाला होता. 

महाविकास आघाडीत इनकमिंग वाढणार

लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत इनकमिंग वाढण्याची शक्यता आहे. अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघांमधील आमदार धास्तावले आहेत. विशेषत: अजित पवार गट आणि शिंदे गटातील अस्वस्थ आमदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गोटात परतण्याची शक्यता आहे. अजितदादा गटाच्या 10 आमदारांनी सुप्रिया सुळे यांना बारामतीमधील विजयानंतर अभिनंदनाचे मेसेज केल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीतील मतांची टक्केवारी

काँग्रेस- 13 जागा (16.92 टक्के)
भाजप- 9 जागा (26.18 टक्के)
ठाकरे गट- 9 जागा (16.72 टक्के)
शरद पवार गट- 8 जागा (10.27 टक्के)
शिंदे गट- 7 जागा (12.95 टक्के)
अजित पवार गट- 1 जागा (3.60 टक्के)

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?

देशपातळीवरील समीकरणं

एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17

भाजप- 240
काँग्रेस- 99

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1

महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8

आणखी वाचा

महाराष्ट्रात राजकारणाचं कल्चर, रडीचा डाव खेळू नये, पक्ष फुटले तरी त्यांच्या जागा जास्त आल्या: पंकजा मुंडे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
×
Embed widget