एक्स्प्लोर

2024 च्या लोकसभा निवडणुकीत केजरीवालांच्या AAP च्या झाडूची जादू चालणार? पोल ऑफ पोल्सचे निकाल काय सांगतात?

2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला किती जागा मिळू शकतात? तीन वेगवेगळ्या सर्वेक्षणांच्या आकडेवारीनं लोकांचा भ्रमनिरास केला आहे. पोल ऑफ पोलमध्ये अरविंद केजरीवाल यांचा फायदा की तोटा? जाणून घ्या सविस्तर...

Lok Sabha Election 2024 AAP Seats Opinion Poll: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? यावर आतापर्यंत अनेक सर्वेक्षणं झाली आहेत. तसेच, त्यांचे निष्कर्षही समोर आले आहेत. एकूणच भाजपच्या एनडीए (NDA) आघाडीला इंडिया (I. N. D. I. A) अलायन्सपेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज जवळपास सर्वच सर्वेक्षणांमधून वर्तवण्यात आला आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचाही समावेश आहे. या सर्वेक्षणांमध्ये आम आदमी पक्षानं मिळवलेल्या जागांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. एकंदरीत विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या साथीनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणं आपसाठी फायद्याचं की, तोट्याचं? सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार जाणून घेऊयात...  

पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन आघाड्या आमनेसामने आहेत. इंडिया आघाडीत विरोधी एकजूट कायम राहिल्यास 2024 मध्ये सत्ताधाऱ्यांची एनडीए आणि विरोधकांच्या इंडियामझ्ये मोठी लढत पाहायला मिळू शकते. 2019 मध्ये AAP नं लोकसभेची फक्त एक जागा जिंकली होती, पण आगामी लोकसभा निवडणुकींसंदर्भातील सर्वेक्षणांमध्ये पक्षाला मोठा फायदा होताना दिसत आहे. एका सर्वेक्षणात अरविंद केजरीवाल यांचा पक्ष दिल्लीत खातं उघडू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पंजाबमध्ये 'आप'ला इंडिया अलायन्ससोबत एकापेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असंही सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमधून समोर आलं आहे. जाणून घ्या कोणत्या सर्वेक्षणात अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला किती जागा मिळाल्यात? 

या सर्वेक्षणात 'आप'ला अधिक फायदा?

इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या सर्वेक्षणात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या 'आप' पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये 10 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ओव्हरऑल सर्व्हेमध्ये एनडीएला 318 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि आपसह विरोधी इंडिया आघाडीला 175 जागा आणि इतरांना 50 जागा मिळाल्याचं दाखवण्यात आलं आहे. दिल्लीतील एकूण सात जागांपैकी इंडिया आघाडी दोन आणि एनडीएला 5 जागा जिंकता येतील. तर इंडिया आघाडी पंजाबमध्ये क्लीन स्वीप करू शकते. पंजाबमधील 13 जागांपैकी 'आप'ला 8 तर काँग्रेसला 5 जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणाची आकडेवारी जुलैअखेर जाहीर करण्यात आली होती.

इंडिया आघाडीपूर्वी AAP ला किती जागा?

टाईम्स नाऊ ईटीजी सर्वेक्षणातही अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत फायदा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सर्वेक्षणानुसार 'आप'ला 4 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच, पक्षाला 2019 च्या निवडणुकीपेक्षा 3 ते 6 जागा जास्त मिळण्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. लोकसभेच्या एकूण जागांमध्ये भाजपच्या एनडीए आघाडीला 285 ते 325 जागा आणि काँग्रेसच्या यूपीए आघाडीला 111 ते 149 जागा मिळाल्याचं दाखवण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, हे सर्वेक्षण इंडिया आघाडीच्या स्थापनेपूर्वी करण्यात आलं होतं. ज्याचा निकाल जूनमध्ये आला होता. 

या महिन्यात जाहीर झालेल्या सर्वेक्षणात कोणाला किती जागा?

इंडिया टुडे सी-व्होटरनं या महिन्यात मूड ऑफ द नेशन सर्वेक्षण डेटा जारी केला आहे. 15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. यामध्ये एनडीएला 306 जागा आणि इंडिया आघाडीला 193 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 44 जागा मिळू शकतात. आपबद्दल बोलायचं झालं तर केजरीवाल यांच्या पक्षाला दिल्लीत एकही जागा मिळालेली नाही. दिल्लीतील सातही जागा भाजपलाच मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेचीSpecial Report : Chhaava Movie Teaser Controversey :  छावाचा टिझर, वादाचा ट्रेलरMission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Embed widget