India Today Survey: 2024 निवडणुकीपूर्वी आणखी एक नवं सर्वेक्षण, NDA ला झटका, तर काँग्रेसची ताकद वाढणार
Lok Sabha Election 2024: आता लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक नवं सर्वेक्षण समोर आलं आहे. हे सर्वेक्षण इंडिया टुडेनं 24 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार इंडिया आघाडीच्या जागांमध्ये वाढ झाली आहे.
India Today Survey Opinion Poll Results: 2024 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) आज झाल्या तर कोणाला किती जागा मिळतील? काँग्रेससह (Congress) 26 विरोधी पक्षांची इंडिया आघाडी (INDIA Alliance) भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीएला (NDA) टक्कर देऊ शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं एका नव्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून समोर आली आहेत. इंडिया टुडेनं सर्वेक्षण (India Today Survey) केलं असून त्यात एनडीएच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे. जाणून घ्या सर्वेक्षणाचे आकडे काय सांगतात...?
इंडिया टुडे मूड ऑफ द नेशनचं हे सर्वेक्षण 15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे. सर्व राज्यातील एकूण 25,951 मतदारांशी बोलल्यानंतर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. इंडिया टुडेच्या ओपिनियन पोलनुसार, एनडीए आणि इंडिया अलायन्समधील मतांच्या शेअरमध्ये फक्त दोन टक्के फरक असल्याचा अंदाज आहे. सर्वेक्षणात एनडीएला 43 टक्के तर इंडिया अलायन्सला 41 टक्के मतं मिळाली आहेत.
इंडिया आघाडीच्या जागांमध्ये वाढ
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, एनडीए आघाडीला 51 जागांचं नुकसान होऊन एकूण 306 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आतापर्यंत जाहीर झालेल्या सर्व सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार, इंडिया आघाडीच्या जागांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. या सर्वेक्षणात विरोधी पक्षांच्या महाआघाडीला एकूण 193 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इतर पक्षांना 44 जागा मिळू शकतात, असंही निष्कर्षातून समोर आलं आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएनं 357 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडीला केवळ 91 जागा मिळाल्या होत्या. याचप्रकारे आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएला एकूण 51 जागा कमी पडू शकतात, तर काँग्रेसच्या मित्रपक्षांच्या जागा दुप्पट होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, इंडिया टुडेच्या सर्वेक्षणात काँग्रेस आघाडीला 153 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
आज लोकसभा निवडणुका पार पडल्या, तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार भाजपच्या एनडीए आघाडीला यावेळीही पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजप एकहाती बहुमताचा आकडा 272 पार करू शकतो. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत भाजपला 16 जागा कमी मिळण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कोणाकडे किती जागा आहेत?
एनडीए (NDA) : 306 जागा
इंडिया (INDIA) : 193 जागा
भाजप (BJP) : 287 जागा
काँग्रेस (Congress) : 74 जागा
इतर : 184 जागा
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये 'ही' 6 राज्य NDA चं टेन्शन वाढवणार?
टाइम्स नाऊच्या नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी फारच धक्कादायक आहे. सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार, विजय आपलाच अशा अविर्भावात असलेल्या एनडीएला 6 राज्यांमध्ये जोरदार धक्का बसू शकतो. सर्वेक्षणानुसार, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, इंडिया आणि NDA आघाडीला फक्त दोन टक्क्यांपेक्षा जास्त मतांच्या फरकानं विजय मिळण्याची अपेक्षा आहे. बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या 6 राज्यांमध्ये 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत विरोधी आघाडीला तसा फारसा फायदा होताना दिसत नसला. तरीदेखील एनडीएला मात्र काही प्रमाणात नुकसान होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणाची सॅम्पल साईज एक लाख 10 हजारांहून अधिक आहे. सुमारे 60 टक्के लोकांचे फोनवरून सर्वेक्षण करण्यात आले असून 40 टक्के लोकांना घरोघरी जाऊन प्रश्न विचारण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :